सिकलसेल तपासणी करूनच विवाह करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:57 PM2017-12-12T22:57:58+5:302017-12-12T22:58:17+5:30

Get married through a sickle inspection | सिकलसेल तपासणी करूनच विवाह करा

सिकलसेल तपासणी करूनच विवाह करा

Next
ठळक मुद्देरवींद्र ठाकरे : सिकलसेल सप्ताह व बेटी बचाव रॅली

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : राष्ट्रीयय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग गोंदिया व प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था गोंदिया आणि पी.सी.पी.एन.डी.टी. विभागामार्फत सिकलसेल सप्ताह व बेटी बचाओ रॅली काढून सुरूवात करण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी विद्येची देवता सरस्वतीच्या छायाचित्राल माल्यार्पण करून दीपप्रज्वलन केले.
या वेळी मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रूखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. देवप्रकाश चौरागडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शुद्धोधन सहारे, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेचे सचिव निशा गणवीर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सीईओ ठाकरे यांनी मार्गदर्शनात सिकलसेल आजारामध्ये सिकलसेल तपासणी हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण युवक-युवतींनी विवाहपूर्वी सिकलसेल तपासणी करून घ्यावी. जेणेकरून भविष्यामध्ये सिकलसेल आजार हा नष्ट होऊ शकेल. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सिकलसेल संपुष्टात आणण्यासाठी या उपक्र माला सहकार्य करावे असे आवाहन ठाकरे यांनी केले.
पी.सी.पी.एन.डी.पी.अंतर्गत बेटी बचाओ मोहिमेला जनतेने समजून घेणे काळाची गरज झाली आहे. मुलींचा जन्मदर हा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. तेव्हा मुलगा किंवा मुलगी यांच्यात भेदभाव न करता मुलीला सुद्धा मुलासाखेच महत्व देण्यात यावे, जेणेकरून समाजात समतोल राखता येईल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सुरूवातीला सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्र म यावर प्रबुद्ध विनयती कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शुद्धोधन सहारे यांनी सिकलसेल आजार कसा होतो, त्याचे लक्षण काय आहेत, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी काय औषध उपचार उपलब्ध आहेत. सिकसेल आजाराच्या रुग्णांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच बेटी बचाओ या विषयावर सविता बेदरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सिकलसेल सप्ताहाची सुरूवात सीईओ ठाकरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅलीमध्ये सिकलसेल, बेटी बचाओ यावरचे घोषवाक्यांनी शहर दुमदुमले होते. रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. प्रास्ताविक सपना खंडाईत यांनी केले. संचालन श्रद्धा सपाटे यांनी तर आभार निशा डहाके यांनी मानले. यशस्वीतेसाठी नितू फुले, सुरेंद्र पारधी, योगेश नैकाने, स्वाती वैद्य, टी.एन.लिल्हारे, आरोग्य विभाग तसेच प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेचे नेहा गणवीर, प्रदीप राहुलकर, विक्र ांत रंगारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Get married through a sickle inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.