शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 09:41 PM2018-03-22T21:41:10+5:302018-03-22T21:41:10+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जाहीर झालेले कर्जमाफीचे चालू व थकीत कर्जदारांचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, ..........

Farmer deposits debt forgiveness into account | शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा करा

शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा करा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : सेवा सहकारी संस्थेची मागणी

ऑनलाईन लोकमत
सडक-अर्जुनी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जाहीर झालेले कर्जमाफीचे चालू व थकीत कर्जदारांचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, अशी मागणी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांनो तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे.
मागील वर्षभरापासून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यानुसार नियमित व थकीत असलेल्या कर्जदारांच्या खात्यामध्ये अजुनपर्यंत पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे कर्जवसुली करीत असताना सर्व सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना शेतकºयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
तालुक्याची आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी असूनही पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे तालुक्यातील कोणत्याही शेतकºयांना मिळाले नाही.
त्यामुळे पुढील वर्षापासून शेतकºयांनी पीक विमा योजना कशासाठी काढावी, असा प्रश्न देखील निर्माण केला आहे. शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा सेवा सहकारी संस्थेच्यावतीने देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी डॉ. अविनाश काशीवार, धनलाल करचाल, कृष्णा डोंगरवार, रामदास पुसाम, तेजराम राणे, जागेश्वर धनभाते, युवराज लांजेवार, विलास बागडकर, रमेश घासले, भैय्यालाल पुस्तोडे, ईश्वर कोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Farmer deposits debt forgiveness into account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.