वाहनांवर पोलिस, आर्मी, प्रेस नका लिहू; नियम सर्वांना सारखा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:33 PM2024-05-08T18:33:20+5:302024-05-08T18:34:10+5:30

नियमाला बगल : कायद्याचा धाकच नाही, नातेवाइकांकडूनही होतो गैरवापर

Do not write police, army, press on vehicles; The rules are the same for everyone | वाहनांवर पोलिस, आर्मी, प्रेस नका लिहू; नियम सर्वांना सारखा भाऊ

Do not write police, army, press on vehicles; The rules are the same for everyone

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिस अधिकारी व कर्मचारी पोलिस असे लिहितात. पोलिसांचा लोगो असलेले स्टिकर लावतात. अनेकदा पोलिसांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाइकांकडून पोलिस या नावाचा - गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. पोलिस पाटी लावून खासगी वाहन चालवित असल्याबाबत उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे, तर साहेब, धाक आहेच, मग वाहनावर पोलिस, आर्मी, प्रेसचे लोगो कशाला, असा सवाल केला जात आहे. 

डॉक्टर, पत्रकार, पोलिस, फौजेच्या नावाचा व लोगोचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. अशी वाहने नाकाबंदी व सुरक्षा तपासणी न होता सोडतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात आर्मी लिहिलेली वाहने सहज दिसतात. अशी पाटी लावलेल्या वाहनांमार्फत घातपात होऊ शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली आहे.


लोगो लावून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. गोंदियाच्या जिल्हा वाहतूक पोलिसांनी बुलेटच्या सायलेन्सरवर जशी कारवाई केली, तशी कारवाई लोगो लावणाऱ्यांवर करण्याची गरज आहे.


शहरात काय आढळले?
• गोंदिया तालुक्यातील तुरळक पोलिसांनी त्यांच्या खासगी वाहनांवर पोलिस पाटी किवा स्टिकर लावलेले आहे. परंतु ते वाहन पोलिस ठाण्यात घेऊन जात नाही.
• ज्यांचे प्रेससंबंधी काहीच घेणे-देणे नाही त्यांनीही वाहतूक पोलिसांपासून आपला बचाव करण्यासाठी आपल्या वाहनांवर प्रेस लिहून ठेवले आहे.
• डॉक्टर आणि आर्मी लिहिलेल्या गाड्याही शहरात बिनधास्त धावत आहेत.


होऊ शकते शिस्तभंगाची कारवाई
पोलिस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या खासगी वाहनांवर पोलिस पाटी किवा पोलिसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून टाकण्याचे आदेश पोलिस अधीक्षक देऊ शकतात.


होईल शिस्तभंगाची कारवाई
पोलिस पाटी किंवा पोलिसांचे चिन्ह, आर्मी, डॉक्टर, पत्रकार असलेले स्टिकर्स वाहनावर लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

सदरक्षणाय खलनिग्रहणायचा प्रत्यय द्या
सर्वसामान्य माणसांना पोलिस आपला आहे, आपल्या रक्षणासाठी आहे हा भाव येऊ द्या, गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक असू द्या, ही खरी पोलिसिंग आहे.

नियम सर्वांना सारखाच
नागरिकांना समान कायदा या तत्त्वानुसार पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहे. नियम सर्वांना सारखाच आहे. कुणी उल्लंघन करताना आढळले तर त्यांच्यावर नक्की कारवाई करू. 
- किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.

 

Web Title: Do not write police, army, press on vehicles; The rules are the same for everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.