शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 09:54 PM2018-07-15T21:54:19+5:302018-07-15T21:54:59+5:30

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड श्री पद्धतीने करावी. कीट नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक व बुरशीनाशक नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून मिळवून घ्यावे, ....

Coordination is necessary for the upliftment of the farmers | शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक

शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक

Next
ठळक मुद्देव्ही.एम. भाले : हिवरा येथील कृषी तंत्र विद्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड श्री पद्धतीने करावी. कीट नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक व बुरशीनाशक नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून मिळवून घ्यावे, असा सल्ला अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विश्वविद्यालयाचे उपकुलपती डॉ.व्ही.एम. भाले यांनी दिला.
हिवरा येथील कृषी तंत्र विद्यालयात घेण्यात आलेल्या वार्षिक आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी अकोला कृषी विश्वविद्यालयाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ.डी.एम. मानकर यांनी जिल्ह्यातील शेतीच्या स्थितीची माहिती जाणून घेतली व गोंदियातील तज्ज्ञ शेतकऱ्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. त्यांनी, जिल्ह्यातील वातावरण फळबाग, रेशीम शेतीसाठी पोषक आहे. येथील शेतकरी आर्थिक समृद्ध होवू शकतात असे सांगीतले. त्याचप्रकारे सिंदेवाही येथील वरिष्ठ संशोधक तथा सहायक संचालक संशोधन, मध्यवर्ती कृषी केंद्र संशोधन केंद्राचे डॉ.पी.व्ही. शेंडे यांनी तुडतुडा कीटकाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.
गोंदिया कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ.एन.एस. देशमुख यांनी, वार्षिक कार्यांचा अहवाल मांडून पाहुण्यांचे आभार मानले. नाबार्डचे जिल्हा सहव्यवस्थापक निरज जागरे यांनी, नाबार्डच्या विविध योजनांचा लाभ विभागनिहाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कृषी पणन तज्ज्ञ तथा आत्माचे उपप्रकल्प संचालक सचिन कुंभार यांनी, आत्माद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी एन.व्ही. नयनवाड यांनी, कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू योजनांची माहिती दिली व खरीप हंगामाबाबत चर्चा केली. वन विभागाचे स्वप्नील ढोणे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
सभेत कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.ओ. बावकार, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.एम.एन. काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.पी. घोगरे, प्रगतिशील शेतकरी रेखलाल टेंभरे, संतोष बिसेन, मनोज कोरे, बाबुलाल कटरे, राजलाल माहुले, कृषी विज्ञान केंद्राचे एम.व्ही. भोमटे, विषयतज्ज्ञ आर.डी. चव्हाण, डॉ.सविता पवार, के.सी. गांगडे, आर.पी. चव्हाण, सोमनाथ गवते, पी.एन. रामटेके व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Coordination is necessary for the upliftment of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.