समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:51 PM2018-02-03T21:51:42+5:302018-02-03T21:53:12+5:30

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती समाजाचा उद्धार करी’ असे महिलांबाबत बोलले जाते. कुटूंबाला संस्कारीत करण्याचे कसब महिलांमध्ये असून ती समाजाचा विकासही करून शकते.

 Come forward to give direction to the community | समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे

समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे

Next
ठळक मुद्देकल्पना भेंडारकर : इंझोरी येथील कुणबी समाजाचा हळदीकुंकू कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती समाजाचा उद्धार करी’ असे महिलांबाबत बोलले जाते. कुटूंबाला संस्कारीत करण्याचे कसब महिलांमध्ये असून ती समाजाचा विकासही करून शकते. आजची महिला कर्तबगार आहे. त्यामुळे स्वत:मध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता समाजाची प्रगती साधण्यास महिलांनी चार भिंतीच्या बाहेर येवून समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे असा हितोपदेश सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भेंडारकर यांनी दिला.
अर्जुनी-मोरगाव कुणबी समाज संघटनेच्यावतीने ग्राम इंझोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला उद्योगिका प्रतिभा फुंडे, नगरसेविका येमु ब्राम्हणकर, गीता ब्राम्हणकर, डॉ. मनिषा भेंडारकर, कमला पाऊलझगडे, डॉ. सुधा रहिले, पिंगला ब्राम्हणकर, सरपंच मिनाक्षी रहिले, अलका मेंढे, उपसरपंच दिपीका रहिले, कल्पना भेंडारकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
तत्पूर्वी महिलांना सन्मानाचे, हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मा. जिजाऊ, सरस्वती देवी यांच्या प्रतिमासमोर दिप प्रज्वलन व पुष्पहार घालून अभिवादनासह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ३५ गावांतील महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी भजन व भावगीत गावून महिलांनी आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षी लोकेश तरोणे यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. समाजाची बांधीलकी राहावी, समाज एकसंघ राहावा, समाजाला नवी दिशा मिळून जनजागृती व्हावी, एकमेकाच्या दुखात सहभागी होऊन मदतीसाठी पुढे यावे या विषयावर महिलांमध्ये विचार मंथन झाले.
दरम्यान हळदीकुंकू लावून समाजाच्यावतीने उपस्थित महिलांना भेट वस्तु देण्यात आली. संचालन लता मेंढे यांनी केले. प्रास्ताविक कल्पना खोटेले यांनी मांडले. आभार मनिषा तरोणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेडारकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, छगन लोणारे, प्रकाश शिवणकर, रविंद्र खोटेले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी कल्पना भेंडारकर, गायत्री मेंढे, वंदना शिवणकर, लता मेंढे, शामा चुटे यांच्यासह समाजातील महिलांनी सहकार्य केले.

Web Title:  Come forward to give direction to the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.