स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:59 PM2017-11-21T23:59:23+5:302017-11-21T23:59:34+5:30

शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते.

Cleanliness should be a folk force | स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

Next
ठळक मुद्देरमेश चुऱ्हे : सिंदीपार येथे जागतिक शौचालय दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते. त्यामुळे सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. स्वच्छतेसाठी लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन सौंदड जि.प. क्षेत्राचे सदस्य रमेश चुऱ्हे यांनी केले.
रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सिंदीपार येथे जागतिक शौचालय दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत परिसरात घेण्यात आले. या वेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
अतिथी म्हणून सडक-अर्जुनीचे सहायक गटविकास अधिकारी तुरकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे रामचंद्र रहांगडाले, सिंदीपारचे सरपंच टेकाम, उपसरपंच शिवदास परशुरामकर, विस्तार अधिकारी झामरे, माजी सरपंच हरिचंद उईके आदी उपस्थित होते.
सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन करण्याचे शालेयतज्ज्ञ भागचंद्र रहांगडाले, केंद्रप्रमुख लांडगे, मुख्याध्यापक पटले, सहायक गटविकास अधिकारी तुरकर यांनी शौचालय वापराविषयी मार्गदर्शन केले.
भागचंद्र रहांगडाले यांनी शौचालयाचा वापर आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगून जागतिक शौचालय दिनाचे महत्व विशद केले. यावेळी नादुरुस्त शौचालय असणाºया लाभार्थ्यांच्या घरी गृहभेटी देवून त्यांना शौचालय वापरावर मार्गदर्शन करण्यात आले.
संचालन व आभार ग्रामसेवक डी.बी. पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला गटसंसाधन केंद्राचे गटसमन्वयक राधेश्याम राऊत, भूमेश्वर साखरे, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पोलीस पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Cleanliness should be a folk force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.