बौद्धधम्म प्रत्येकाच्या आचरणात दिसणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:20 PM2019-01-20T22:20:26+5:302019-01-20T22:21:30+5:30

भगवान बुद्धांचा वैज्ञानिक व समतावादी धम्म जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विहारांमधून, सभा संमेलनामधून भिख्खू संघाच्या वाणीतून व विचारवंतांच्या मार्गदर्शनातून मोठ्या प्रमाणात सांगितला जातो. परंतु अशा सभा संमेलनामधून सांगितला जाणारा बुद्धांचा धम्म प्रत्येकाच्या आचरणात दिसणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भंडारा येथील भदंत नागसेन महास्थवीर यांनी केले.

Buddhist must be seen in everybody's attitudes | बौद्धधम्म प्रत्येकाच्या आचरणात दिसणे गरजेचे

बौद्धधम्म प्रत्येकाच्या आचरणात दिसणे गरजेचे

Next
ठळक मुद्देनागसेन महास्थवीर : धम्मगिरी येथे आंतरराज्यीय धम्मसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भगवान बुद्धांचा वैज्ञानिक व समतावादी धम्म जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विहारांमधून, सभा संमेलनामधून भिख्खू संघाच्या वाणीतून व विचारवंतांच्या मार्गदर्शनातून मोठ्या प्रमाणात सांगितला जातो. परंतु अशा सभा संमेलनामधून सांगितला जाणारा बुद्धांचा धम्म प्रत्येकाच्या आचरणात दिसणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भंडारा येथील भदंत नागसेन महास्थवीर यांनी केले.
येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वनपर्यटक समितीच्यावतीने सोमवारी (दि.१४) आयोजित आंतरराज्यीय बौद्धधम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन नांदेडचे भदंत श्रद्धाबोधी थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. धम्मोपदेशक म्हणून भदंत डॉ. जीवक थेरो, भदंत धम्मशिखर, भंते करुणाशील तर प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, संस्थापक सचिव यादव मेश्राम, उपाध्यक्ष अनुप गडपांडे, चंद्रबोधी पाटील, बालेश्वर चौरे, महेंद्र मडामे, तिमाजी मेश्राम, अनिल मेश्राम, नरेंद्र शेंडे, भरत वाघमारे, डॉ. नेहा बोरकर, इंजि. प्रशांत रावते, राजभूषण मेश्राम, टिकेश बोंबार्डे, महेश शेंडे, कुवर रामटेके, उपस्थित होते.
सामूहिक बुद्धवंदनेने संमेलनाला सुरुवात झाली. याप्रसंगी भदंत श्रद्धाबोधी थेरो, भदंत धम्मशिखर यांनी समायोचित धम्मोपदेश केला तर दुसऱ्या सत्राच्या धम्मपरिचर्चा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र लेडे यांनी ‘अखिल मानवजातीचे हीत साधणारा धम्म’ या विषयावर, डॉ. विकास जांभूळकर यांनी ‘धम्मविचारातून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल’ या विषयावर तर पुष्पा बौद्ध यांनी ‘स्त्री विकासात बौद्धधम्माची भूमिका’ याविषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी समितीच्यावतीने भिक्खू संघाला चिवर दान करण्यात आले. तसेच समिती व भाजी विक्रेता संघाच्यावतीने भोजनदान करण्यात आले.
प्रास्ताविक यादव मेश्राम यांनी मांडले. संचालन दिलीप मून, एन.आर.रामटेके, प्रा.डी.एस.टेंभुर्णे, प्रा. मिलींद रंगारी यांनी केले. आभार मनू मेश्राम व डॉ. शुध्दोधन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, सचिव यादव मेश्राम, सहसचिव राकेश रामटेके, उपाध्यक्ष अनुप गडपांडे, कोषाध्यक्ष मुनेश्वर मेश्राम, रामचंद्र घुले, रमण हुमे, प्रशांत मेश्राम, जनार्धन शिंगाडे, सुनिता मेश्राम, गुड्डी रामटेके व समाजबांधवानी सहकार्य केले.

Web Title: Buddhist must be seen in everybody's attitudes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.