अतिक्रमणधारकांना दिला ‘जोर का झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:00 PM2019-05-10T21:00:28+5:302019-05-10T21:01:32+5:30

व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली.

'Blow of blow' to encroachment holders | अतिक्रमणधारकांना दिला ‘जोर का झटका’

अतिक्रमणधारकांना दिला ‘जोर का झटका’

Next
ठळक मुद्देरस्त्यावरील अतिक्रमण काढले : वाहतूक नियंत्रण शाखेची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. शुक्रवारी (दि.१०) राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर मांडलेले साहित्य जप्त करून रस्ते मोकळे केले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या या मोहिमेमुळे मात्र शहरातील व्यापाºयांना ‘जोर का झटका’ बसला.
शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात व्यापारी रस्ताच्या दोन्ही बाजुंनी आपल्या दुकानातील साहीत्य मांडून आणखी अतिक्रमण करतात. यामुळे रस्ते आणखीच अरूंद होवून नागरिकांना वाहतूक करताना त्रास सहन करावा लागतो.
शहरातील बाजार भागात पावला-पावलावर वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना आता बाजारात येणे नकोसे झाले आहे. मात्र व्यापारी आपले साहित्य रस्त्यावर मांडून मोकळे होत असून नागरिकांच्या त्रासाला घेऊन त्यांना काहीच सोयरसुतक नाही. एवढेच नव्हे तर, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या दुकानासमोर गाडी उभी केल्यास त्या व्यक्तीला ते आपल्या दुकानासमोर गाडी उभी करून देत नाही. उलट आपल्या मालकीची जागा असल्याचा आव आणत भांडणावर उतरतात.
परिणामी नागरिकांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून सामानाची खरेदी करावी लागते. एक-दोन करीत वाहनांची रांगच लागत असून अन्य नागरिकांचा यामुळे त्रास सहन करावा लागतो. बाजारातील हे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली होती.
नागरिकांच्या या समस्येची गांर्भीयाने विचार करीत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला व्यापाऱ्यांचे हे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवारी (दि.१०) शहरातील बाजार भागात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.
यांतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा व नगर परिषदेच्या संयुक्तवतीने बाजार भागातील व्यापाºयांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
या भागात राबविली मोहीम
वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक संजय सिंग यांच्यासह वाहतूक शाखेचे १० कर्मचारी व १० पोलीस कर्मचारी तसेच नगर परिषद बांधकाम विभागातील अभियंता कावडे, अनिल दाते नियोजन विभागातील अभियंता शरणागत, सलाम यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. यांतर्गत चांदनी चौक ते गांधी प्रतिमा, गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक, गोरेलाल चौक ते नेहरू चौक तसेच रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत रेल्वे स्टेशन रोड व पाल चौक परिसरात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.
२० व्यापाऱ्यांवर केली कारवाई
या मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २० व्यापाऱ्यांवर १०२ अंतर्गत कारवाई केली आहे. काही व्यापाºयांचे सुमारे ३५ हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता व्यापाºयांना न्यायालयातून त्यांचे सामान सोडवून घ्यावे लागणार आहे. या मोहिमेनंतर व्यापाºयांचे रस्त्यांवरील सामान दिसेनासे झाल्याने रस्ते मोकळे झाल्याचे चित्र होते.

शनिवारीही बाजार भागात मोहीम
शहरवासीयांची वाहतुकीच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक साहू यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला सातत्याने ही मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने शनिवारीही बाजार भागात मोहीम राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम आता सातत्याने सुरू राहणार असून ज्या कुणाकडून रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडचण निर्माण केली जाईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय सिंग यांनी सांगीतले.

Web Title: 'Blow of blow' to encroachment holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.