बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:08 AM2018-06-30T00:08:02+5:302018-06-30T00:09:29+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Blood donation camp for Babuji's birth anniversary | बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सोमवारी

बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सोमवारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व लोकमान्य ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूना मदत करण्याची ही संधी लोकमतने उपलब्ध करुन दिली आहे. येथील शासकीय ब्लड बँकेत सुध्दा नेहमीच रक्ताची टंचाईची असते.त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते.ही अडचण लक्षात घेत लोकमत वृत्तपत्र समुहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्य व लोकमत वाचकांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांनी आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार ९८२३१८२३६७,सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्सना सहारे ९४२१०६४७२२ यांच्याशी संपर्क साधवा.
 

Web Title: Blood donation camp for Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.