बायकर्सनी मोटारसायकलने गाठला २२०० किमीचा लांब पल्ला

By अंकुश गुंडावार | Published: March 19, 2024 02:42 PM2024-03-19T14:42:59+5:302024-03-19T14:43:54+5:30

उणे १७ अंश सेल्सियस तापमान असलेल्या ठिकाणी व समुद्रतळापासून ३७६२ मीटर उंचीवर असलेले मिशन मुक्तीधाम त्यांनी पूर्ण केले. यासाठी सतत ७ दिवसापर्यंत २२०० किमीचा प्रवास केला.

Bikers covered a long distance of 2200 km by motorcycle | बायकर्सनी मोटारसायकलने गाठला २२०० किमीचा लांब पल्ला

बायकर्सनी मोटारसायकलने गाठला २२०० किमीचा लांब पल्ला

गोंदिया : मोटारसायकलने प्रवास कुणाला आवडत नाही. मात्र या आवडीला छंद म्हणून अनेक ध्येय ठरवून ते गाठणारे युवक -युवती बायकर्स म्हणून नावारूपास येत आहेत. असेच गोंदिया शहरातील ऋषभ खंडेलवाल व ऋषभ वर्मा या दोन युवकांनी नुकतेच नेपाळ-तिबेट सिमेवर असलेल्या कठीण व दुर्गम समजल्या जाणार्‍या मुक्तीनाथ या स्थळाला ध्येय म्हणून गाठले. उणे १७ अंश सेल्सियस तापमान असलेल्या ठिकाणी व समुद्रतळापासून ३७६२ मीटर उंचीवर असलेले मिशन मुक्तीधाम त्यांनी पूर्ण केले. यासाठी सतत ७ दिवसापर्यंत २२०० किमीचा प्रवास केला.

नेपाळ-तिबेट सिमेवर असलेले मुक्तीनाथ येथे भगवान विष्णुचे प्राचिन मंदीर आहे. दुर्गम आणि डोंगर दर्‍यांनी वेढलेले या मंदिराला घेऊन भाविकांमध्ये मोठी श्रध्दा आहे. ३ मार्च रोजी गोंदिया येथील ऋषभ खंडेलवाल व ऋषभ वर्मा हे दोन युवक मोटारसायकलने मुक्तीनाथ मंदिराच्या दिशेने निघाले. प्रवासादरम्यान अयोध्या, नेपाळ येथील पशुपतीनाथ, मुक्तीनाथ असा प्रवास करून परत येताना काशी  विश्वनाथ येथून दर्शन घेतले. १६ मार्च रोजी ३८०० किमीचा प्रवास करीत ते गोंदिया येथे परतले. अनुभव सांगताना ऋषभ खंडेलवाल यांनी सांगितले की, प्रवासदरम्यान सोनोली -नेपाल बॉडरवरून त्यांनी सात दिवसांचा व्हिजा घेतला होता. दुर्गम  व बर्फाच्छादित प्रदेश असल्याने या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड देत हे मिशन गाठण्याचे आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होते. त्यांच्याकडे टिव्हीएस रेडर ही बाईक असल्याचे ते म्हणाले. मुक्तीनाथ येथे काढण्यात आलेले व्हिडीओ, रिल्स सोशल मिडियावर शेयर केल्यानंतर त्यांना आजपर्यंत ७० हजाराहून अधिक लोकांनी बघितल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Bikers covered a long distance of 2200 km by motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bikeबाईक