बाबाटोलीवासीयांना मिळणार हक्काचे घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:37 AM2018-12-02T00:37:16+5:302018-12-02T00:39:00+5:30

मागील ३० वर्षापासून अस्थायी झोपड्यांमध्ये किंवा उघड्यावर वास्तव्य करीत असलेला बाबाटोली येथील छप्पर बंद फकीर समाजाला आता स्वत:चे हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाबाटोलीतील फकीर समाजाच्या समाजाच्या समस्यांना लोकमतने वृत्त मालिकेच्या माध्यमातून वाचा फोडली.

Babatoli residents will get the right to house | बाबाटोलीवासीयांना मिळणार हक्काचे घरकूल

बाबाटोलीवासीयांना मिळणार हक्काचे घरकूल

Next
ठळक मुद्देनगर पंचायतने मागविले अर्ज : भूमीहिनांना मिळणार घरासाठी पट्टे

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील ३० वर्षापासून अस्थायी झोपड्यांमध्ये किंवा उघड्यावर वास्तव्य करीत असलेला बाबाटोली येथील छप्पर बंद फकीर समाजाला आता स्वत:चे हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाबाटोलीतील फकीर समाजाच्या समाजाच्या समस्यांना लोकमतने वृत्त मालिकेच्या माध्यमातून वाचा फोडली. याचीच दखल प्रशासनाने बाबाटोलीतील कुटुंबांना घरकूल बांधकामासाठी जमिनीचे पट्टे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यापूर्वी बाबाटोली ग्रामपंचायत आमगाव खुर्द अंतर्गत फुलेनगरच्या हद्दीत येत होती. काही महिन्यापूर्वी सालेकसा नगर पंचायतची हद्दवाढ करीत आमगाव खुर्दचा समावेश सालेकसा नगर पंचायतमध्ये करण्यात आला. त्यामुळे आता बाबाटोली येथील समस्या सोडविण्याची जबाबदारी सालेकसा नगर पंचायतवर आली आहे.
मात्र आत्तापर्यंत बाबाटोलीतील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. परिणामी येथील फकीर समाज मागील ३० वर्षांपासून उघड्यावर जीवन जगत होता.
लोकमतने बाबाटोलीला भेट देऊन येथील समस्यांना वृत्तमालिकेच्या माध्यमातून वाचा फोडली. ८० टक्के बाबाटोलीवासीय निवाऱ्यापासून वंचित या शिर्षकाखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशीत केले. त्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली.
नगर पंचायतमध्ये घरकुल योजनेसाठी केलेल्या लाभार्थ्यांची पहिली यादी नुकतीच संबंधीत विभागाकडे देण्यात आली. त्यात इतर लाभार्थ्यांप्रमाणेच बाबाटोली येथील लाभार्थ्यांचा समावेश असून त्यांना सुध्दा आता हक्काचे घरकुल मिळणार आहे. काही लोकांच्या नावाने जमिनीचे पट्टे नसल्याने सध्यातरी घरकुल योजनेचा लाभ मिळत नसला तरी त्यांना भूमिहिन दाखवून त्यांच्या निवाºयाची समस्या दूर करण्यासाठीे त्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दुसºया टप्यात पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आवर्जुन भरण्यासाठी न.प.चे कर्मचारी बाबाटोली येथील लोकांशी संपर्क करुन त्यांना आवश्यक कागदपंत्राची माहिती देणार आहेत.

प्रत्येक नागरिकाला घरकुलाचा लाभ मिळावा व प्रत्येक कुटुंब पक्या घरात वास्तव्य करावे. या हेतूने नगर पंचायत शासन, प्रशासन विशेष लक्ष आहे. बाबाटोलीवासीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकमतने लक्ष वेधल्याबद्दल आभार.
- विरेंद्र उईके, नगराध्यक्ष न.प.सालेकसा

Web Title: Babatoli residents will get the right to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.