जिल्ह्यातील ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:47 PM2018-10-22T21:47:59+5:302018-10-22T21:48:15+5:30

खरीप पणन हंगाम २०१८-१९ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी दराने धान विकावे लागू नये,यासाठी जिल्ह्यात गैर आदिवासी क्षेत्रात जिल्हा मार्केटींग अधिकारी गोंदिया व आदिवासी क्षेत्रात प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ या खरेदी अभिकर्तामार्फत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे.

Approval of 57 Paddy Purchasing Centers in the district | जिल्ह्यातील ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी

जिल्ह्यातील ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप पणन हंगाम २०१८-१९ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी दराने धान विकावे लागू नये,यासाठी जिल्ह्यात गैर आदिवासी क्षेत्रात जिल्हा मार्केटींग अधिकारी गोंदिया व आदिवासी क्षेत्रात प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ या खरेदी अभिकर्तामार्फत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी प्रस्तावित केल्यानुसार ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी प्रदान करण्यात आली असून शेतकºयांनी आपला धान, धान खरेदी केंद्रांवरच हमी भावाने विकावा. साधारण धानाकरीता १७५० व अ दर्जा धानाकरीता १७७० प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे. केंद्र शासनाने हंगाम २०१८-१९ करीता धानासाठी १७ टक्के आद्रतेचे प्रमाण निश्चित केले आहे.
गोंदिया तालुक्यात गोंदिया, टेमनी, गिरोला, कटंगीकला, रतनारा, दासगाव, काटी, अदासी, कामठा, नवेगाव धापे., रावणवाडी, मजितपूर, कोचेवाही, आसोली, गोरेगाव तालुक्यात गोरेगाव, कालीमाटी, तिमेझरी, गणखैरा, कुऱ्हाडी, चोपा, तेढा, दवडीपार, कवलेवाडा, मोहगाव तिल्ली. तिरोडा तालुक्यात चिरेखनी, पांजरा, वडेगाव, नवेझरी, विहिरगाव, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, तिरोडा, मुंडीकोटा, चिखली, मेंढा, आमगाव तालुक्यात आमगाव, गोरठा, कालीमाटी, सालेकसा तालुक्यात कोटजांभोरा, सालेकसा, सडक अर्जुनी तालुक्यात पांढरी, सौंदड, मुरपार, बाम्हणी, हेटी, धानोरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध, महागाव, बोंडगावदेवी,वडेगाव स्टेशन, बाकटी, धाबेटेकडी, भिवखिडकी व अर्जुनी मोरगाव-अशा एकूण ५७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: Approval of 57 Paddy Purchasing Centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.