हेराफेरी टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर जामर लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:10 PM2018-05-19T22:10:03+5:302018-05-19T22:10:03+5:30

कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत या प्रकाराची पुनर्रावृत्ती होवू नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जामर लावण्याची गरज असल्याचे माजी खासदार नाना पटोले यांनी येथे सांगितले.

Apply jam to each center to avoid rigging | हेराफेरी टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर जामर लावा

हेराफेरी टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर जामर लावा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : पारदर्शक पार पडावी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत या प्रकाराची पुनर्रावृत्ती होवू नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जामर लावण्याची गरज असल्याचे माजी खासदार नाना पटोले यांनी येथे सांगितले.
कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर आता भाजपमध्ये सत्तेत सहयोगी असलेला शिवसेनेचे पक्षनेते सुध्दा ईव्हीएम निवडणूक मशिनवर शंका घेत आहे. आम्ही सुध्दा निवडणूक अधिकारी यांना लोकशाही पध्दतीने व निष्पक्षपणे निवडणूक व्हावी. तसेच गुजरातमधील सुरत येथून ईव्हीएम मशिनच्या मागणीबाबत विरोध केला. त्यासंबंधीचे निवेदन खासदार प्रफुल्ल पटेल व मी सुध्दा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. भाजपच्या शासनामुळे लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनला विरोध केला आहे. आता तरी लोकांनी जागृत होण्याची गरज असल्याचे पटोले म्हणाले.
केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. पण रिमोट कंट्रोलमुळे कुणाला आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार नाही. त्यामुळेच मी स्वत: खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न ज्या नेत्यांनी केला त्याचांही एकनाथ खडसे आणि गोपिनाथ मुंडे यांच्या सारखाच गेम झालेला आहे. कृषी मोटारपंपांना चोविस तास वीज पुरविण्याचे आश्वासन सत्ताधाºयांनी दिले होते. परंतू ते आश्वासन सुध्दा खोटे ठरले आहे. प्रधानमंत्री यांच्यासारखे मोठे नेते संयम सोडून बोलत असतात.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत ते दिसून आले. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. ही लोकशाहीची परंपरा नाही. मी लोकशाही मानणारा व्यक्ती असून शेतकरी व बेरोजगार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकित्रतपणे लोकसभेची निवडणूक लढवित आहेत.
तिन वेळा आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मधुकर कुकडे यांना लोकांच्या समस्येची जाणीव आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस उमेदवार वरचढ असल्याचा दावा पटोले यांनी केला. भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
देशातील मोठ्या नेत्यांचे भंडारा, गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीकडे लक्ष लागले आहे. अन्याय करणारी व्यवस्था हाणून पाडण्यासाठी शेतकरी व बेरोजगार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खोटे आश्वासन देवून लोकांना भुरळ पाडणाºया भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Web Title: Apply jam to each center to avoid rigging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.