अंगणवाडी सेविकांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 09:18 PM2017-10-05T21:18:39+5:302017-10-05T21:18:57+5:30

अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी ....

Anganwadi Sevikas 'Path Roko' | अंगणवाडी सेविकांचा ‘रास्ता रोको’

अंगणवाडी सेविकांचा ‘रास्ता रोको’

Next
ठळक मुद्देसरकारच्या विरोधात नारेबाजी : अटक देत नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी (दि.५) दुपारी १२ वाजता गोंदिया-बालाघाट मार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने विविध अंगणवाडी संघटनांनी ५ आॅक्टोबरला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता.
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हा शाखेच्या नेतृत्त्वात गुरूवारी जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जयस्तंभ चौक येथून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आणि फडणवीस सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची दखल न घेणाºया सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बाप्पाच्या, असे नारे देत शासनाचा निषेध नोंदविला. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नेहरु चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी शासनाचा निषेध नोंदवित स्वत:हून पोलिसांना अटक दिली.
अटक देण्यापूर्वी शेकडो अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेऊन काहीवेळानंतर त्यांची सुटका केली. मोर्चादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्त्व हौसलाल रहांगडाले, शंकुतला फटींग, आम्रकला डोंगरे, जिवनकला वैद्य, बिना गौतम, ब्रिजुला तिडके, सुनीता मलगामे, विजया डोंगरे, प्रेमलता तेलसे, लिलावती रहांगडाले, सविता मोवारे, शंकुतला गोडाने, कल्पना पटले, उषा लांजेवार, कविता सहारे, पदमेश्वरी बिसेन, सुनीता रहमतकर, शारदा खोब्रागडे, मंगला शहारे, कांता डोंगरवार यांनी केले.

पोलिसांची धावपळ
अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी गोंदिया बालाघाट मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या त्यामुळे पोलिसांची थोडी धावपळ उडाल्याचे चित्र होते.

Web Title: Anganwadi Sevikas 'Path Roko'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.