आंबेनाला प्रकल्प लवकरच मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 09:10 PM2018-01-07T21:10:26+5:302018-01-07T21:10:55+5:30

Ambeen project to be implemented soon | आंबेनाला प्रकल्प लवकरच मार्गी लावणार

आंबेनाला प्रकल्प लवकरच मार्गी लावणार

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : इंदोरा खुर्द येथे रुग्णवाहिकीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : आंबेनाला लघु प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी भरला असून गुगलद्वारे सर्वेक्षण होणे बाकी आहे. उशीर का होईना हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी खचला असून केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याची गरज असताना सरकार यातून पळवाटा शोधत असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.६) येथे आयोजित कार्यक्रमात केला.
तालुक्यातील इंदोरा खुर्द येथे सरपंच नितेश खोब्रागडे यांनी रुग्णांच्या सेवेसाठी ग्रामपंचायतला रुग्णवाहिका भेट दिली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूरचे आ. प्रकाश गजभिये, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, जगण धुर्वे, उषा किंदरले, किशोर पारधी, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, विणा बिसेन, संध्या गजभिये, जया धावडे, मनोहर राऊत, प्रदीप मेश्राम, माया भगत, माया शरणागत, निता रहांगडाले, पंचम बिसेन निमगावच्या सरपंचा निता पटले उपस्थित होते. पटेल म्हणाले, सरपंचानी केलेल्या मागण्या शंभर टक्के पूर्ण करु, प्रसंगी अदानीचे शाहू यांनाही सांगणार. कमी पावसाअभावी जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. सरकारने शेतकºयांना हेक्टरी ६९०० रुपये मदतीची घोषणा रडत रडत केली. धानाला केवळ २०० रुपये बोनस दिले. इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी आहे.
केंद्र सरकार जनतेच्या उपयोगी योजना बंद करीत आहे. केरोसिन, गॅस सिलिंडर ४०० वरुन ८०० रुपयांवर पोहचले. डिझेल व पेट्रोलचे दर वाढविले, शाळांचे खासगीकरण होत आहे, नोकर भरती बंद आहे. बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरपंचानी देणगी स्वरुपात रुग्णवाहिका दिली ही फारच अभिमानाची बाब आहे. प्रास्ताविकातून एस.एस.सोनवाने यांनी इंदोरा खुर्द येथील समस्या यांनी सांगितल्या. सरपंच खोब्रागडे यांनी सांगितले की यापूर्वी माझी पत्नी ही सरपंच होती.
१०८ क्रमांकाची रुग्णवाहिका इथपर्यंत पोहोचण्यास उशीर होत होता. त्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील जनतेची सेवा व्हावी या उद्देशाने रुग्णवाहिका दिल्याचे सांगितले. बन्सोड म्हणाले शासनाने पूर्णत: दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सरपंच रिता पटले यांनीही आपल्या गावच्या समस्यांचे, मागण्यांचे निवेदन यावेळी दिले. या वेळी परिसरातील ९१ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे संचालन हितेंद्र बावने, आभार पोलीस पाटील ईश्वरदास गौतम यांनी मानले. यशस्वीतेसाठी माजी सरपंच हेमलता नितेश खोब्रागडे, उपसरपंच प्रल्हाद पटले, सदस्य युवराज कटरे, धृवराज दरवडे, धनपाल पारधी, कविता उके, शशीकला सुरसाऊत, आरती पटले, ममता येळे, कविता लांजेवार, ग्रामसेवक पाटील, डॉ. के.डी.बिसेन, के.जी. रहांगडाले, भोजलाल पटले, पांडुरंग ठाकरे, नरेश असाटी, बबलदास रामटेके, जयश्री गभणे, हिरालाल दरवडे, माणिकराम खोब्रागडे, सतपाल पारधी, कैलाश रहांगडाले, लिलाधर रहांगडाले यांनी सहकार्य केले.

Web Title: Ambeen project to be implemented soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.