करंजी गावात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 10:03 PM2019-06-09T22:03:29+5:302019-06-09T22:04:23+5:30

तालुक्यातील ग्राम करंजी येथे दोन दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Agnitandav in Karanji village | करंजी गावात अग्नितांडव

करंजी गावात अग्नितांडव

Next
ठळक मुद्देतीन गोठे व घर खाक : आगीचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील ग्राम करंजी येथे दोन दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बुधवारी (दि.५) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहनलाल तावाडे व भरतराम तावाडे या भावंडांच्या घराला आग लागून संपूर्ण घर व गोठा जळून खाक झाला. यात बैलगाडी, नांगर, शेती उपयोगी साहित्य व जनावरांचा चारा जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (दि.६) सकाळी आत्माराम गायधने यांच्या घराला अचानक आग लागून त्यांचेही घर पूर्णत: जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील जीवनोपयोगी व शेती उपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले.
तर दुपारी १२ वाजताच्या सुमारास उदाराम फुंडे यांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटना मानवी कृत्याने की शॉटसर्किटने घडल्या याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
नागरिकांमध्ये दहशत
अचानक आग लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरातील साहित्य घराबाहेर काढले आहेत. अचानक लागणाऱ्या आगीला विझविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून गावात जागोजागी पाण्याचे ड्रम भरुन ठेवले जात आहेत.

Web Title: Agnitandav in Karanji village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग