आमगावातील रेतीमाफियांवर कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:27 AM2019-02-03T00:27:37+5:302019-02-03T00:28:04+5:30

शंभूटाला येथील वाघनदीच्या घाटातून रेतीचा उपसा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच महसूल विभाग खळबळून जागा झाला. यासंदर्भात तहसीलदार साहेबराव राठोड व त्यांच्या चमूने रेती वाहून नेणाऱ्या रेती घाटांवर धाड टाकून दोन ट्रॅक्टरला पकडले.

Action on racketeering in Amagamwa | आमगावातील रेतीमाफियांवर कारवाई सुरू

आमगावातील रेतीमाफियांवर कारवाई सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देएका ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल : दोघांना प्रत्येकी एक लाख १५ हजाराचा दंड, इतर रेती घाटांकडे लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शंभूटाला येथील वाघनदीच्या घाटातून रेतीचा उपसा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच महसूल विभाग खळबळून जागा झाला. यासंदर्भात तहसीलदार साहेबराव राठोड व त्यांच्या चमूने रेती वाहून नेणाऱ्या रेती घाटांवर धाड टाकून दोन ट्रॅक्टरला पकडले. एका ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला. तर ५३ ब्रास रेतीचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील भरत काशिराम शेंडे व खुमेश भरतलाल हुकरे या दोघांनी ३१ जानेवारीच्या पहाटे बाम्हणी येथील वाघनदीच्या रेतीघाटातून रेती काढण्यासाठी आपले ट्रॅक्टर लावले होते. या वेळी तहसीलदार साहेबराव राठोड व त्यांच्या चमूने धाड घालून ट्रॅक्टर एमएच ३५ जी ७७४४ ट्राली एमएच एफ ३१६७ व एमएच ३५ जी ७७४४ ट्राली एम एच ३५ एफ ३१६७ या दोन ट्रॅक्टरमध्ये रेती टाकून अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडले. पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेऊ नये यासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात लावण्यात आले आहे. त्या दोघांच्या विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ खालील व महाराष्ट्र शासन रात्रपत्र असाधारण भाग ४ चे कलम ४८ जानेवारी २०१८ मधील परिछेद ८,९ आणि ९.२ मधील तरतूदीनुसार अवैध वाहतूक केल्याबद्दल १ लाख रुपये दंड, गौण खनिजाच्या बाजार मुल्याच्या पाचपट दंड १५ हजार रूपये व स्वामीत्वधानची रक्कम रूपये ४०० रूपये असे एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपये प्रत्येकी अश्या दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर २ लाख ३० हजार ८०० रूपये दंड करण्यात आला.
तहसील कार्यालायने यापूर्वी २४ जानेवारीला नंदेश्वर उपासराव शिवणकर रा.सुपलीपार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चिरचाळबांध येथून अवैध रेती वाहून नेत असताना पकडले होते.
त्यांच्यावर आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इतर रेती घाटांचे काय?
जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने जवळपास सर्वच रेती घाटावरुन रेती तस्करी सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी विविध उपाय योजना केल्या. मात्र याचा कुठलाच परिणाम झाला नसल्याचे चित्र शंभूटोला घाटावर सुरू असलेल्या रेती तस्करीवरुन स्पष्ट झाले.

५३ ब्रास रेती जप्त
आमगाव तालुक्याच्या पिपरटोला येथील शांतीराम दादुराम मच्छीरके रा.पिपरटोला याच्याकडून ५३ ब्रास रेती जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राठोड यांनी दिली आहे. शांतीराम दादुराम मच्छीरके याने वाघ नदीतील रेती काढून त्या रेतीचा साठा करून ठेवला होता. तो साठा जप्त करण्यात आला आहे.त्या साठ्याचा लिलाव ७१ हजार रूपयात करण्यात आला असून रक्कम शासनाला जमा करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले
आमगाव तालुक्यातील शंभूटोला व इतर रेतीघाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू होती. याबाबत काहींनी महसूल विभागाला पुरावे देखील दिले. मात्र आमगाव तहसील कार्यालयाने यावर कुठलीच कारवाई केली नाही. दरम्यान लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर याची जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दखल घेत आमगाव येथील तहसीलदारांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे. तर काही जणांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

रेतीची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आमचे पथक मेहनत घेत आहे. आमगाव तालुक्यात कुठे रेतीची वाहतूक होत असेल तर आम्हाला संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- साहेबराव राठोड,
तहसीलदार आमगाव.

Web Title: Action on racketeering in Amagamwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू