गोंदिया जिल्ह्यात सिलेंडरच्या स्फोटात १५ दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:08 AM2019-05-30T10:08:08+5:302019-05-30T10:08:30+5:30

तिरोडा येथे रेल्वेस्थानकाजवळील एका गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळपासची सुमारे १५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.

15 shops has burnt in the explosion of gas cylinder in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात सिलेंडरच्या स्फोटात १५ दुकाने खाक

गोंदिया जिल्ह्यात सिलेंडरच्या स्फोटात १५ दुकाने खाक

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यरात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: तिरोडा येथे रेल्वेस्थानकाजवळील एका गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळपासची सुमारे १५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.
तिरोडा रेल्वेस्थानक परिसरात नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या एका गॅस वेल्डींगच्या दुकानात गुरुवारी पहाटे सुमारे 2 वाजेच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण करून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 100 फुटापर्यंत असलेली सुमारे १५ टपरीवजा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि अदानी समुहाच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Web Title: 15 shops has burnt in the explosion of gas cylinder in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग