१३६७ शाळांत ‘तंबाखूबंदी’ला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:41 PM2019-06-18T21:41:18+5:302019-06-18T21:41:49+5:30

विद्यार्थी व्यसनाच्या गर्ततेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी शासनाच्या ११ निकषात खऱ्या उतरणाऱ्या जिल्ह्यातील फक्त ३१४ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

1367 schools quit 'tobacco' | १३६७ शाळांत ‘तंबाखूबंदी’ला तिलांजली

१३६७ शाळांत ‘तंबाखूबंदी’ला तिलांजली

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १५ आगस्टपर्यंत सर्व शाळांमध्ये तंबाखूबंदी करा

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थी व्यसनाच्या गर्ततेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी शासनाच्या ११ निकषात खऱ्या  उतरणाऱ्या जिल्ह्यातील फक्त ३१४ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तंबाखूला जवळ येऊ देणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनाही देण्यात आली आहे. परंतु ११ निकषात आजही १३६७ शाळा बसल्या नाहीत.
कर्करोगासारखा असाध्य रोग हा तंबाखूपासून जडत असते. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांना पत्र पाठवून तंबाखूमुक्त शाळा करण्यास सांगितले. त्यांच्या सुचनेनुसार गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी ११ निकषपूर्ण करणाºया अ‍ॅपवर ११७७ शाळांनी नोंदणी केली. त्यातील ७२५ शाळांनी स्वत:ला तंबाखूमुक्त दाखविले परंतु त्या शाळा अजूनपर्यंत ११ निकषात न बसल्यामुळे त्यांना त्या अ‍ॅपद्वारे रद्द करण्यात आले. ११ निकष न भरलेल्या १३८ शाळा आहेत. फक्त ३१४ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत.
त्यात गोंदिया १२६, आमगाव ३७, तिरोडा २३, सडक-अर्जुनी २४, सालेकसा १२, अर्जुनी-मोरगाव ३४, देवरी ३७, गोरेगाव २१ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. ३२ टक्के शाळांनी तंबाखूमुक्त शाळा या अ‍ॅपमध्ये नोंदणीच केली नाही. त्या शाळांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तंबाखू विक्री करणाऱ्यांवर आता फौजदारी कारवाई
तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांना सोबत घेऊन त्यांच्यावर कारवाई करा असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तंबाखुमुक्त अभियान चालविणाऱ्या मोहीमेच्या सदस्यांना दिले आहे. सोबतच तंबाखू चघळणाऱ्या शिक्षकांनाही तंबाखू सोडा अन्यथा कारवाईस तयार व्हा अशी फटकारले आहे.
दंडात्मक कारवाई
शाळेत तंबाखू खातांना विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी आढळले तर त्यांना २०० रूपये दंड म्हणून आकारण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात १०० मीटरच्या अंतरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६८१ शाळांतील २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यानुसार शाळा तंबाखूमुक्त करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.
दाभना हे एकमेव तंबाखूमुक्त गाव
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या दाभना या गावाने तंबाखुमुक्त गाव म्हणून ठराव घेतला आहे.जिल्ह्यातील पहिले तंबाखुमुक्त गाव म्हणून हे गाव पुढे आले आहे. दुसऱ्या गावांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Web Title: 1367 schools quit 'tobacco'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.