मडगाव अर्बन व म्हापसा अर्बन पीएमसीत विलीन होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:29 PM2019-05-09T18:29:27+5:302019-05-09T18:30:31+5:30

पीएमसीच्या ऑडीटर्सच्या पथकाने मडगाव अर्बनची बॅलन्सशीटस्  व अन्य कागदपत्रची पडताळणीही केली आहे.

On the way to the merger of Madgaum Urban and Mapusa Urban PMC | मडगाव अर्बन व म्हापसा अर्बन पीएमसीत विलीन होण्याच्या वाटेवर

मडगाव अर्बन व म्हापसा अर्बन पीएमसीत विलीन होण्याच्या वाटेवर

Next

 

मडगाव:   गोव्यातील  जुन्या सहकारी बॅंकापैकी असणा-या मडगाव अर्बन व  म्हापसा अर्बन या दोन्ही बॅंका  पंजाब अॅंड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (पीएमसी) या बहुराज्य सहकारी बॅंकेत विलीन करण्यासाठी बोलणी चालू असून ही बोलणी सकारात्मक दिशेने चालू आहे. पीएमसीच्या ऑडीटर्सच्या पथकाने
मडगाव अर्बनची बॅलन्सशीटस्  व अन्य कागदपत्रची पडताळणीही केली आहे.

सध्या या दोन्ही बॅंका आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या असून जर त्या पीएमसीत विलीन केल्या तर गोव्यातील सहकार क्षेत्रतून  या दोन्ही बॅंकांचे नाव कायमचे पुसले जाणार आहे. दोन्ही बॅंकांच्या सगळया लायबिलीटीसह सर्व मालमत्ता या विलिनीकरणानंतर पीएमसीची होणार आहे. या दोन्ही बॅंकानी दिलेल्या प्रस्तावाला  पीएमसी बॅंकेने सकारात्मक उत्तर दिले आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. म्हापसा अर्बन बॅंकेच्या विलिनीकरणासंदर्भातील चर्चा शेवटच्या टप्प्यात असून  मडगाव अर्बनची बोलणी मात्र आताच सुरु झाली आहे.

 सामान्य व्यापा-यांना धंदय़ासाठी वित्तपुरवठा कुठल्याही कटकटीविना प्राप्त व्हावा यासाठी   मडगाव व म्हापसा या दोन्ही शहरातील  व्यापारी व नागरिक  एकत्र येऊन या दोन्ही सहकारीब् बॅंकांची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांचा संपूर्ण राज्यात विस्तारही करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात  बॅंकानी दिलेल्या कर्जाची वसुली प्रभावीपणो न झाल्यामुळेच या दोन्ही बॅंका आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आल्या. त्यामुळे या बॅंकांच्या कारभारात शेवटी रिझव्र्ह बॅंकेला हस्तक्षेप करावा लागला.
 म्हापसा अर्बन बॅंकेवर रिझव्र्ह बॅंकेने  24 जुलै 2015 रोजी  निर्बंध घातले होते. या र्निबधामुळे ग्राहकांना सहा महिन्याच्या कालावधीत केवळ एक हजार रुपयेच काढता येत होते.  मात्र यंदाच्या फेब्रुवारी नंतर हे र्निबध  काहीसे शिथील करुन  सहा महिन्याच्या कालावधीत पन्नास हजार रुपयांर्पयत पैसे काढण्याची सवलत देण्यात आली होती. मडगाव अर्बन बॅंकेवर या महिन्याच्या 2 तारखेपासून र्निबध घालण्यात आले असून पुढच्या सहा महिन्यात बॅंकेतील खातेदारांना केवळ पाच हजार रुपयांर्पयत पैसे काढता येणार आहेत.

म्हापसा अर्बनच्या अधिका-याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे म्हापसा अर्बनच्या विलिनीकरणाचे सोपस्कार  जवळपास पूर्ण झाले असून  येत्या पंधरा
दिवसात या संबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मडगाव अर्बनच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला सहा ते आठ महिन्याच्या कालावधीचा अवधी लागू
शकतो.  सध्या गोव्यात म्हापसाअर्बनच्या 24 शाखा असून मडगाव अर्बनच्या दहा शाखा आहेत. पीएमसी बॅंक गोव्यातही कार्यरत असून  या बॅंकेंच्या  सहा शाखा
 सध्या  गोव्यात चालतात.

एकेकाळी भरभराटीला आलेल्या गोव्यातील या दोन्ही जुन्या सहकारी बॅंका गोव्यातील खाण उदय़ोगामुळे  गोत्यात आल्याचे सांगितले जात आहे. खाण
उदय़ोजकांना दिलेली कर्जे  थकल्यामुळेच या दोन्ही बॅंकावर अशी स्थिती आल्याचे सांगितले जाते.

Web Title: On the way to the merger of Madgaum Urban and Mapusa Urban PMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.