श्रीलंका संरक्षण मंत्रालय अधिका-यांची गोवा शिपयार्डला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 09:23 PM2018-01-12T21:23:20+5:302018-01-12T21:23:25+5:30

श्रीलंकेचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचे नौदल अधिकारी, तटरक्षक दलाच्या अधिका-यांसमवेत श्रीलंकेच्या संरक्षण दलाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच गोवा शिपयार्ड कंपनीला सदिच्छा भेट देऊन

Sri Lankan Defense Ministry officials gift greetings to the Goa shipyard | श्रीलंका संरक्षण मंत्रालय अधिका-यांची गोवा शिपयार्डला सदिच्छा भेट

श्रीलंका संरक्षण मंत्रालय अधिका-यांची गोवा शिपयार्डला सदिच्छा भेट

googlenewsNext

वास्को : श्रीलंकेचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचे नौदल अधिकारी, तटरक्षक दलाच्या अधिका-यांसमवेत श्रीलंकेच्या संरक्षण दलाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच गोवा शिपयार्ड कंपनीला सदिच्छा भेट देऊन तेथे भारतीय नौदलासाठी बांधण्यात येत असलेल्यार युध्दनौकांची पाहणी या शिपयार्डमध्ये श्रीलंका नौदलासाठी दोन अपतटिय गस्ती नौका बांधण्याची आॅर्डर दिलेली असून त्यापैकी एक गस्ती नौका बांधून २ आॅगस्ट २०१७ रोजी ती श्रीलंका नौदलाकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे़ तर दुस-यार गस्ती नौकेचे बांधकाम जोरात चालु आहे़ गोवा शिपयार्डमध्ये या शिष्टमंडळाने फे रफ टका मारून तेथे चालु असलेल्या जहाज बांधणी कामाचा आढावा घेतला आणि या शिपयार्ड कंपनीची तत्परता तसेच कामगारांचे कौशल्य पाहुन हे शिष्टमंडळ प्रभावित झाले व त्यांनी गोवा शिपयार्ड कंपनीचे कौतुकही केले़

गोवा शिपयार्ड कंपनीच्या अधिका-यानी शिपयार्डमध्ये चालु असेलल्या कामाची माहिती या शिष्टमंडळास देण्यात आली़ श्रीलंका संरक्षण मंत्रालयाचे सचिव कपिल वैद्यरत्ने यांनी शिपयार्डच्या कामाची प्रशंसा केली़

 

Web Title: Sri Lankan Defense Ministry officials gift greetings to the Goa shipyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.