शेतात उतरलेल्या राजकीय नेत्यांची सोशल मीडियाने उडवली टर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 12:09 PM2018-07-04T12:09:44+5:302018-07-04T12:09:56+5:30

चॅलेंज स्वीकारून शेतात उतरलेल्या व त्याबाबतचे फोटो सर्वत्र पसरविलेल्या गोव्याच्या काही मंत्री, आमदारांची व अन्य राजकारण्यांची सोशल मीडियाने टर उडविणे सुरू केले आहे.

Social media of the politicians who landed in the field blew up | शेतात उतरलेल्या राजकीय नेत्यांची सोशल मीडियाने उडवली टर

शेतात उतरलेल्या राजकीय नेत्यांची सोशल मीडियाने उडवली टर

Next

पणजी : चॅलेंज स्वीकारून शेतात उतरलेल्या व त्याबाबतचे फोटो सर्वत्र पसरविलेल्या गोव्याच्या काही मंत्री, आमदारांची व अन्य राजकारण्यांची सोशल मीडियाने टर उडविणे सुरू केले आहे. शेतात रोज राबणा-या व किंचित मोबदल्यासाठी बराच घाम गाळणा-या शेतक-यांची गोव्याचे मंत्री, आमदार एक दिवस फोटोपुरते शेतात उतरून थट्टा करत आहेत, अशी टीका काही नेटिझन्सनी चालवली आहे.

राज्यातील काही आमदार हे शेतात काम करत आले आहेत, पण त्यांनी कधी आपण शेतात उतरत असल्याचे दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत. मात्र नावेलीचे सरपंच सिद्धेश भगत यांनी चॅलेंज देताच काही मंत्री, आमदार व अन्य राजकारणी शेतात उतरले व त्यांनी आपले फोटो, व्हिडीओ वगैरे सोशल मीडियावर शेअर केले. काही राजकारण्यांनी नवे कपडे वापरून शेतक-याची वेशभूषा केली व त्याला चिखलही लावला. आपल्या भागातील मंत्री व आमदार शेतात काम करत असल्याचे पाहून आमदारांचे कार्यकर्ते व समर्थक खूश झाले. पण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरवरून लोकांनी राजकारण्यांची टर उडविणे सुरू केले आहे. शेतात उतरून शेताविषयी व शेतक-यांविषयी प्रेम दाखवा, असे आव्हान सरपंच भगत यांनी दिले होते.

मंत्री व आमदारांनी एका दिवसापुरते शेतात उतरण्याऐवजी शेतजमिनी राखून ठेवाव्यात, त्या जमिनींचे बेकायदा रुपांतरण थांबवावे, असा सल्ला उच्च माध्यमिक विद्यालयात शिकविणा-या अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे. मंत्री, आमदारांनी आपआपल्या परिसरात फेरफटका मारावा व गोव्यात किती शेतजमीन लोकप्रतिनिधींच्या कृपाशीर्वादाने बेकायदा भराव टाकून बुजविली जाते ते पाहावे, असा सल्ला आदर्श फळदेसाई यांनी फेसबुकवरून दिला आहे.

शेतीविषयक नवे कायदे आणण्यापूर्वी भाटकार आमदार शेतकरी व अनुसूचित जमातींच्या हितासाठी यापूर्वीच्या काळात संमत झालेले जुने कायदे अंमलात आणण्याचे कष्ट प्रामाणिकपणे घेतील काय, असा प्रश्न आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून विचारला आहे. राजकारण्यांकडून शेतात उतरण्याचा जो लाक्षणिक देखावा केला जातो, त्यातून गोव्याच्या शेत जमिनींच्या लँडस्केपमध्ये काही फरक पडणार आहे काय, असा प्रश्न काही नेटीझन्सनी विचारला आहे. काही नेटिझन्सनी मात्र मंत्री व आमदारांच्या कृतीचे समर्थन चालवले आहे. दरम्यान, गोव्याच्या काही मंत्र्यांनी आता माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो व अन्य काही काँग्रेस आमदारांना शेतात उतरण्याचे आव्हान दिले आहे. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मंत्री रोहन खंवटे व मंत्री विजय सरदेसाई हे नुकतेच शेतात उतरले होते.

Web Title: Social media of the politicians who landed in the field blew up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा