गोव्यात दाबोळी विमानतळावरून आता कायमस्वरुपी कदंब बसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:42 PM2018-01-21T20:42:51+5:302018-01-21T21:09:58+5:30

दाबोळी विमानतळावरून कळंगुट, कांदोळी, म्हापसा, पणजी, मडगाव या ठिकाणी जाण्यासाठी यापुढे कायमस्वरूपी कदंब बसगाड्यांची व्यवस्था केली जाईल.

Permanent Kadamba Buses Now From Dabali Airport In Goa | गोव्यात दाबोळी विमानतळावरून आता कायमस्वरुपी कदंब बसेस

गोव्यात दाबोळी विमानतळावरून आता कायमस्वरुपी कदंब बसेस

Next

पणजी : दाबोळी विमानतळावरून कळंगुट, कांदोळी, म्हापसा, पणजी, मडगाव या ठिकाणी जाण्यासाठी यापुढे कायमस्वरूपी कदंब बसगाड्यांची व्यवस्था केली जाईल. सुरुवातीला ७ ते ८ बसगाड्या या सेवेसाठी वापरल्या जातील. विमानतळावरील अंतर्गत सर्व टॅक्सी काऊंटर यापुढे पर्यटन विकास महामंडळ चालवणार आहे. प्रीपेड टॅक्सी पर्यटन विकास महामंडळाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून किंवा या काऊंटरवरून आरक्षित कराव्या लागतील. अ‍ॅप तीन ते चार महिन्यांत कार्यान्वित होईल.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. विमानतळावरील काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या अपुरी आहे. ती वाढविण्यात येईल. पर्यटकांची टॅक्सीवाल्यांकडून लुबाडणूक झाल्यास सरकारी पोर्टलवर आॅनलाइन तक्रार करता येईल. जीटीडीसीने एक योजना तयार केली असून त्याअंतर्गत टॅक्सीवाल्यांना दिवशी हमखास ७00 रुपये उत्पन्न मिळविता येईल. ही योजना लवकरच मार्गी लावण्यात येणार असून त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टॅक्सींना स्पीड गव्हर्नरची आवश्यकता नाही, असे सरकारचे स्पष्ट मत असले तरी सार्वजनिक वाहतुकीतील इतर सर्व वाहनांना सक्ती हवीच, असेही सरकारचे म्हणणे आहे.

गेल्या तीन दिवसातील टॅक्सी संपाच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर म्हणाले की, आंदोलकांनी आधी बंद मागे घ्यावा ही आपली पहिली अट होती कारण त्यांनी कोणतीही नोटिस न देता अचानक बंद पुकारला होता व तो नियमबाह्य होता. सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर टॅक्सी चालविणाºया ज्या टॅक्सी गेले तीन दिवस बंद ठेवण्यात आहेत त्यांची कंत्राटे रद्द करण्यात येतील. केवळ बांधकाम खात्यातच असे १२ ते १३ टॅक्सीमालक आढळले असून त्यांचे कंत्राट रद्द करुन वर्षभर काळ्या यादीत टाकले जाईल.

Web Title: Permanent Kadamba Buses Now From Dabali Airport In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.