लोक काँग्रेससोबतच

By admin | Published: May 25, 2016 02:48 AM2016-05-25T02:48:21+5:302016-05-25T02:49:57+5:30

पणजी : राज्यातील लोकांनी सत्ताधारी भाजपचा या वेळी पराभव करावा, असे ठरवूनच टाकले आहे. लोक काँग्रेससोबतच आहेत;

People with Congress | लोक काँग्रेससोबतच

लोक काँग्रेससोबतच

Next

पणजी : राज्यातील लोकांनी सत्ताधारी भाजपचा या वेळी पराभव करावा, असे ठरवूनच टाकले आहे. लोक काँग्रेससोबतच आहेत; कारण सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन केवळ काँग्रेसच धर्मनिरपेक्ष राजवट देऊ शकते, हे लोकांना ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अ‍ॅड. यतीश नायक यांनी व्यक्त केली.
आपचे नेते केजरीवाल यांच्या सभेस मोठी गर्दी झाल्याविषयी पत्रकारांनी काँग्रेस हाउसमध्ये यतीश नायक यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, आपण कुठल्याच पक्षाचे नाव घेत नाही व त्याबाबत प्रतिक्रियाही देत नाही; पण एवढेच सांगतो की, गोव्यातील जनता काँग्रेससोबत आहे. भाजपच्या राजवटीला गोमंतकीय कंटाळले आहेत. या सरकारने गोव्यावर मोठ्या कर्जांचा डोंगर ठेवलेला आहे. धर्र्मनिरपेक्ष शक्तींचे हात बळकट करायला हवे, असे लोकांनी ठरवून टाकले असल्याची माहिती
आम्हाला लोकांमध्ये रोज फिरताना मिळते.
यतीश नायक म्हणाले की, काँग्रेसने नुकताच पणजीत मशाल मोर्चा काढला. हजारो लोक त्या मोर्चात सहभागी झाले होते. यावरून स्थिती कळून येते.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी विधानसभेत व संसदेत यापूर्वीच्या काळात केलेल्या सर्व भाषणांचे एकत्रित पुस्तक तयार करण्यात आले असून या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ३ रोजी सायंकाळी चार वाजता गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये केले जाईल व त्या वेळी दिग्विजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल.
(प्रतिनिधी)

Web Title: People with Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.