राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्भूमीवर विविध क्रीडा प्रकारांसाठी व्यवस्थापक आणि समन्वयकांची नावे जाहीर

By समीर नाईक | Published: September 30, 2023 05:23 PM2023-09-30T17:23:48+5:302023-09-30T17:23:55+5:30

नियुक्त करण्यात आलेले सर्वजण गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेत त्या त्या संबंधित खेळात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Names of managers and coordinators for various sports have been announced in the background of the National Sports Tournament | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्भूमीवर विविध क्रीडा प्रकारांसाठी व्यवस्थापक आणि समन्वयकांची नावे जाहीर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्भूमीवर विविध क्रीडा प्रकारांसाठी व्यवस्थापक आणि समन्वयकांची नावे जाहीर

googlenewsNext

पणजी : गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे राज्यात २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्भूमीवर विविध क्रीडा प्रकारासाठी व्यवस्थापक आणि समन्वयकांची नावे जाहीर केली असून त्यांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेले सर्वजण गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेत त्या त्या संबंधित खेळात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एकूण २७ ठिकाणावर क्रीडा स्पर्धेतील खेळांचे आयोजन होणार आहे.

स्पर्धेची स्थाने, क्रीडाप्रकार व समन्वयक याप्रमाणे: ॲथलेटीक्स स्टेडियम बांबोळी, रग्बी व अॅथलेटीक्स - प्रवीणकुमार शिरोडकर व पास्कोल परेरा, शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे बॅडमिंटन, फॅन्सिंग व व्हॉलीबॉल - हर्षानंद गावकर व विराज रंकाळे. हवाई बीच दोनापावल, येथे रोविंग - हनुमंत गोरावर व रुझारिया मिरांडा. हवाई बीच दोनापावल, येथे यॉटिंग- रामकृष्ण नाईक व विश्वनाथ गोवेकर. करंजाळे मिरामार रोड येथे, ट्रायब्लॉन- कैलाश गावकर व स्वप्नील पार्सेकर. मिरामार बीच, येथे बीच हँडबॉल, बीच व्हॉलीबॉल, आणि मिनी गोल्फ सॅबेस्तियांव नोरोन्हा व चार्ल्स डिसोझा.

कांपाल मल्टिपर्पझ स्टेडियम येथे नेटबॉल, टेबलटेनिस, आणि कबड्डी- संदीप चव्हाण व शिशीर दिवकर, जलतरण संकुल कांपाल, येथे जलतरण- दीपक छेत्री व प्रसाद शेट, कांपाल स्पोर्ट्स विलेज, येथे वेटलिफ्टिंग, वुशू व ज्युडो- मारियो लुईस आगियार व ममता उस्कईकर. कांपाल स्पोर्ट्स विलेज, येथे पँचाक सिलात, गटका व योगासन- नितेंद्र लिंगुडकर व गजानन कांबळी. कांपाल स्पोर्ट्स विलेज, येथे मल्लखांब, कुस्ती व लगोरी- नारायण कांबळी व स्नेहा लिंगुडकर. शापोरा नदी, येथे रोविंग, कॅनोईंग व कायाकिंग- निखिल चोडणकर व पुरुषोत्तम फडते. पेडे इनडोअर स्टेडियम, येथे जिम्नास्टिक्स व बॉक्सिंग- गौरांग धुरी व शंकर फळारी. बॅडमिंटन हॉल पेडे, येथे बिलियर्ड्स व स्नूकर- फाऊस्तो जॅराल्ड लोबो व आलेक्स आल्वारीस. पेडे हॉकी मैदान, येथे हॉकी- व्हिक्टर आल्बुकर्क व कॉनी रॉड्रिग्ज, मांद्रे शुटिंग रेंज, येथे शूटिंग - सुदर्शन गिरप व सुनील गावडे.

फोंडा क्रीडा संकुल, येथे मॉर्डन पँटालॉन- सत्यवान नाईक व गौरीश फडते. फोंडा क्रीडा संकुल, येथे तायक्वांदो- रेश्मा देसाई व अनिल नाईक. फोंडा क्रीडा संकुल, येथे खो-खो - वासुदेव कुट्टीकर व चंदन नाईक. गोवा अभियांत्रिकी कॉलेज, येथे तिरंदाजी - सत्या नाईक व गणेश वेळीप. फातोर्डा स्टेडियम, येथे फुटबॉल पुरूष- मारिया रिबेलो व जॅरी फर्नांडिस. फातोर्डा सराव मैदान, येथे लॉन टेनिस- राजेश नाईक व नूर अहमद मुल्ला.
फातोर्डा मल्टिपर्पझ हॉल, येथे सॅपेकटॅकरो, आणि स्क्वे मार्शल आर्ट्स- संदीप नाईक व अर्जुन गावकर. मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम नावेली, येथे बास्केटबॉल, रोलबॉल व हँडबॉल- दामोदर रेडकर व संतोष म्हापसेकर. कोलवा बीच, येथे बीच व्हॉलीबॉल- रवी देसाई व शॅरोन फर्नांडिस. वेर्णा बिर्ला बायपास एअरपोर्ट रोड येथे, सायकलिंग- लक्ष्मण राऊत व स्वप्नील होबळे. चिखली क्रीडा संकुल,येथे लॉन बोल्स- मुकेश गिरप व कल्पना नाईक. चिखली स्क्वॉश फॅसिलिटी येथे- अजय चौहान व खुशाली वेळीप. टिळक मैदान वास्को, येथे फुटबॉल महिला- योगेश सावळ देसाई व सुकोरिना कॉस्ता.

Web Title: Names of managers and coordinators for various sports have been announced in the background of the National Sports Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा