माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:26 PM2024-03-29T17:26:51+5:302024-03-29T17:27:33+5:30

वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. 

Minor girl raped in Machel, crime against two unknown persons | माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा 

माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा 

अजय बुवा -

फोंडा : माशेल परिसरात तीन महिन्यापूंर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या दोन अज्ञात संशयितांविरोध म्हार्दोळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात ही मुलगी एकटी असताना दोघा अज्ञातांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना त्या मुलीने कोणालाच सांगितली नव्हती. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या पालकांनी लगेच पोलिस ठाणे गाठले. पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत तपास करत आहेत.
 

Web Title: Minor girl raped in Machel, crime against two unknown persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.