दृष्टीकडून रुस, नेपाळ, युके, इराणच्या नागरिकांना जीवनदान

By समीर नाईक | Published: March 28, 2024 03:28 PM2024-03-28T15:28:36+5:302024-03-28T15:28:49+5:30

समुद्राचा आनंद घेताना बुडण्यापासून वाचवलेल्या अनेक व्यक्तींमध्ये रुस आणि नेपाळ नागरिकांचा समावेश होता अशी माहिती दृष्टी तर्फे देण्यात आली.

Life saving to citizens of Russia, Nepal, UK, Iran from Drishti goa | दृष्टीकडून रुस, नेपाळ, युके, इराणच्या नागरिकांना जीवनदान

दृष्टीकडून रुस, नेपाळ, युके, इराणच्या नागरिकांना जीवनदान

होळीच्या या आठवड्यात स्नानासाठी अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्याकडे वळले होते, तर या सणानिमित्त समुद्राचा आनंद घेताना बुडण्यापासून वाचवलेल्या अनेक व्यक्तींमध्ये रुस आणि नेपाळ नागरिकांचा समावेश होता अशी माहिती दृष्टी तर्फे देण्यात आली.

 रुस येथील एका ५० वर्षीय व्यक्तीला आश्वे समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक गणजय सावंत यांनी रेस्क्यू बोर्ड वापरून वाचवले, हा रुस रहिवासी किनाऱ्यावर आंघोळ करत असताना मोठ्या लाटेसोबत वाहून गेला होता. आगोंदा समुद्रकिनाऱ्यावर, नेपाळमधील एका २५ वर्षीय युवकाला बुडताना पाहून जीवरक्षक प्रवीण सागेकर आणि परशुराम पागी यांनी समुद्रात उडी घेत त्याला वाचविले. यासाठी जिवरक्षकानी रेस्क्यू ट्यूब आणि जेट स्कीचा वापर केला आणि त्याला किनाऱ्यावर आणण्यात आले. 

बेंगळुरू येथील एका १८ वर्षीय युवकाला देखील कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. तो उग्र प्रवाहात अडकल्याने जीवरक्षक लेस्ली रॉड्रिग्ज, हरी चोपडेकर आणि सुजन नागवेकर यांनी त्याला वाचविले. दरम्यान अनेक ठिकाणी जिवरक्षकांकडून किनाऱ्यावर जखमी झालेल्यांना प्रथमोपचार आणि वैद्यकीय आपत्कालीन उपचारही करावे लागले.

सीकेरी समुद्रकिनाऱ्यावर युकेतील महिलेचा पोहताना पाय निखळला, जीवरक्षकांना ही माहिती मिळाल्यावर त्या महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. दिल्लीतील ६२ वर्षीय महिला त्याच किनाऱ्यावर असताना बेशुद्ध पडली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता, घटनास्थळी पोहोचलेल्या दृष्टी जीवरक्षकाने तिला प्राणवायू दिले आणि दृष्टी मरीन जीपच्या मदतीने तिला जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवले. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर, कर्नाटकातील एका व्यक्तीचा पडून पाय फ्रॅक्चर झाला, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले.

दूधसागर धबधब्यावर, एक इराणी माणूस चालत असताना खडकाळ पृष्ठभागावर घसरला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी त्याला जीवरक्षक निरज गावकर आणि विठ्ठल मसुरकर यांनी उपचार करत, जखम वाढू दिली नाही. त्याचप्रमाणे २६ वर्षांच्या कर्नाटकातील एका महिलेला अचानक फिट आल्याचा अनुभव आला. उपस्थित जीवरक्षकांनी तिच्यावर प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Life saving to citizens of Russia, Nepal, UK, Iran from Drishti goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा