इफ्फीचे उद्घाटन 'द अस्पन पेपर्स' सिनेमाने होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:06 PM2018-11-14T13:06:25+5:302018-11-14T13:21:01+5:30

49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून 'द अस्पन पेपर्स' हा उद्घाटनाचा सिनेमा असेल.

IFFI to open with The Aspern Papers | इफ्फीचे उद्घाटन 'द अस्पन पेपर्स' सिनेमाने होणार

इफ्फीचे उद्घाटन 'द अस्पन पेपर्स' सिनेमाने होणार

Next
ठळक मुद्दे49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून 'द अस्पन पेपर्स' हा उद्घाटनाचा सिनेमा असेल 'द अस्पन पेपर्स' च्या जागतिक प्रिमिअरवेळी सिनेमातील सगळे महत्त्वाचे कलाकार इफ्फीस्थळी उपस्थित राहणार.'द अस्पन पेपर्स'  हा दिग्दर्शक ज्युलीयन लंडायस यांचा पहिला सिनेमा आहे.

पणजी : 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून 'द अस्पन पेपर्स' हा उद्घाटनाचा सिनेमा असेल. 'द अस्पन पेपर्स' च्या जागतिक प्रिमिअरवेळी सिनेमातील सगळे महत्त्वाचे कलाकार इफ्फीस्थळी उपस्थित राहणार आहेत.

चित्रपट महोत्सव संचालनालयाने (डीएफएफ) बुधवारी येथे याविषयीची माहिती दिली आहे. इफ्फीचा उद्घाटन सोहळा व समारोप बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे.  'द अस्पन पेपर्स'  हा दिग्दर्शक ज्युलीयन लंडायस यांचा पहिला सिनेमा आहे. उद्घाटनाचा सिनेमा हा इफ्फी ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व सक्रीन्सवर दाखविला जाणार आहे. हेन्री जेम्स यांच्या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. जोनाथन मेयर्स हे या सिनेमातील प्रमुख अभिनेते आहेत तर ज्योयली रिचर्डसन ह्या प्रमुख अभिनेत्री आहेत.

ज्योयली या इंग्लिश अभिनेत्री आहेत. त्यांनी 1996 पासून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील बहुतेक चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांना यापूवी दोनवेळा गोल्डन ग्लोब नॉमिनेशन प्राप्त झालेले आहे. व्हेनीसमध्ये या सिनेमाचे चित्रिकरण झालेले आहे. हेन्री जेम्स यांनी जिथे कादंबरी लिहिली होती, तिथेच चित्रिकरण केले गेले आहे. फ्रेंच- पॉलिश चित्रपट निर्माते रोमन पोलंस्की यांची कन्या मोर्गाने पोलंस्की हिनेही  'द अस्पन पेपर्स' या चित्रपटात काम केले आहे. 

दरम्यान, गोवा मनोरंजन संस्था आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाने इफ्फीच्या तयारीच्या कामाला गती दिली आहे. पूर्वीसारखी धावपळ अजून दिसत नाही, कारण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  हे आजारी असल्याने गोवा सरकारचा वेग मंदावला आहे. मात्र गोवा मनोरंजन संस्था व डीएफएफ इफ्फीची सगळी तयारी करत आहे, असे संस्थेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: IFFI to open with The Aspern Papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.