सिनेमाच्या महोत्सवात ताज्या दमाचे नवे विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:06 PM2018-11-27T22:06:17+5:302018-11-27T22:09:07+5:30

दरवर्षी गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वेगवेगळ्या सूत्रांनी बांधलेला असतो. यंदाही डिजिटल थीम घेऊन जगभरातील चित्रपट घेऊन येणारा हा महोत्सव बऱ्याच कारणांमुळे निराशा करणारा ठरला.

IFFI festival News | सिनेमाच्या महोत्सवात ताज्या दमाचे नवे विषय

सिनेमाच्या महोत्सवात ताज्या दमाचे नवे विषय

Next

- संदीप आडनाईक

पणजी - दरवर्षी गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वेगवेगळ्या सूत्रांनी बांधलेला असतो. यंदाही डिजिटल थीम घेऊन जगभरातील चित्रपट घेऊन येणारा हा महोत्सव बऱ्याच कारणांमुळे निराशा करणारा ठरला. एकतर जगभरातील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, सिनेरसिक यांच्यासाठी हा महोत्सव म्हणजे एक कुंभमेळाच असतो; परंतु यंदा हाताच्या बोटावर मोजता येतील असे कलावंत इफ्फीत आले. सरकारच्या अनेक धोरणांनुसार सांस्कृतिकता टिकविण्याच्या आणि वृद्धीच्या भावनेने हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका जागी स्थिर करण्यात आला. या महोत्सवात ताज्या दमाच्या अनेक तरुण दिग्दर्शकांनी नवे विषय हाताळले.

या इफ्फीत अलीकडच्या काळात, विशेषत: २0१८ सालचे अनेक सिनेमे दाखविण्यात आले. त्यात सर्वोत्तम म्हणता येणार नाहीत; परंतु तरीही वेगळ्या विषयावरील अनेक सिनेमे मनात घर करून राहिले. जपानचा ‘शॉप लिफ्टर’ असो अथवा ‘डाय आॅर लाफ’सारखा विनोदाची पखरण करत सत्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करणारा सिनेमा असो, ‘कोल्ड वॉर’ असो की ‘अयका’सारखा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असो, या सिनेमांनी सर्वोत्तम सिनेमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. या महोत्सवात प्रथमच पदार्पण करणाºया सात चित्रपटांचा समावेश होता. विशेष म्हणजे बहुतेक सर्वच दिग्दर्शक हे ताज्या दमाचे आणि तरुण होते. अव्यक्तो, द लोड, नाईट कम्स आॅन, पिजन, टू लेट, व्हल्कॅनो या सिनेमांनी वेगळे मार्ग चोखाळलेले दिसून आले. 

महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यात गांधी मेडलसाठी आलेल्या सिनेमे. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, आॅडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी), पॅरिससोबत विशेष आयसीएफटी पारितोषिक सादर करण्यासाठी समन्वय साधला आहे. युनेस्कोच्या आदर्शांना प्रोत्साहन देणाºया सिनेमांना युनेस्को गांधी पुरस्कार देण्यात येतो. याचा आयसीएफटी पारितोषिकांमध्ये समावेश आहे. अव्यक्तो आणि टू लेट या दोन बरम आणि वॉकिंग विद थ लिंड हा लद्दाखी सिनेमा यात होता.

Web Title: IFFI festival News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.