Manohar Parrikar Death: मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:49 AM2019-03-18T08:49:36+5:302019-03-18T08:50:19+5:30

पर्रीकरांच्या निधनानं देशभरातून हळहळ व्यक्त

Human mind can overcome any disease manohar Parrikar had said a month ago on world cancer day | Manohar Parrikar Death: मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट

Manohar Parrikar Death: मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट

googlenewsNext

पणजी: महिन्याभरापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक ट्विट केलं होतं. कर्करोगाशी दोन हात करताना पर्रीकर यांनी दाखवलेली प्रबळ इच्छाशक्ती त्या ट्विटमधून दिसली होती. कर्करोगामुळे होत असलेल्या प्रचंड वेदना सहन करत असतानाही ते कायम राज्यासाठी झटत होते. त्यामुळेच त्यांच्या निधनानं एक सच्चा, साधा आणि नम्र राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 

महिन्याभरापूर्वीच (4 फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिन होता. त्यावेळी मनोहर पर्रीकरांनी एक ट्विट केलं होतं. 'मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो #WorldCancerDay,' असं पर्रीकरांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्करोगाशी दोन हात करताना पर्रीकर यांनी मोठी इच्छाशक्ती दाखवली. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. काल (रविवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी मेधा यांचंही कर्करोगानं निधन झालं.  




गेल्या वर्षभरापासून पर्रीकर यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबई, नवी दिल्ली, न्यू यॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या काळातही ते काम करत होते. 27 जानेवारीला पणजीतील सिग्नेचर ब्रिजचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला पर्रीकर उपस्थित होते. त्यानंतर तीनच दिवसानंतर 30 जानेवारीला त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. नाकात नळ्या असतानाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निधनानं देशभरातून शोक व्यक्त होत आहे. 

Web Title: Human mind can overcome any disease manohar Parrikar had said a month ago on world cancer day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.