वारसा स्थळे दत्तक देण्याच्याबाबतीत गोवा सरकार पूर्णपणे अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 06:00 PM2018-05-02T18:00:50+5:302018-05-02T18:00:50+5:30

ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध बॉम जिजस बासिलिका चर्चसह गोव्यातील सहा महत्वाची वारसा स्थळे केंद्र सरकारच्या ‘वारसा स्थळे दत्तक घेणो’ या योजनेखाली खासगी आस्थापनाकडे देण्याच्या निर्णयाने गोव्यात खळबळ माजली आहे.

Goa goverment had no idea about remodification of heritage buildings. | वारसा स्थळे दत्तक देण्याच्याबाबतीत गोवा सरकार पूर्णपणे अंधारात

वारसा स्थळे दत्तक देण्याच्याबाबतीत गोवा सरकार पूर्णपणे अंधारात

googlenewsNext

 मडगाव  - ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध बॉम जिजस बासिलिका चर्चसह गोव्यातील सहा महत्वाची वारसा स्थळे केंद्र सरकारच्या ‘वारसा स्थळे दत्तक घेणे’ या योजनेखाली खासगी आस्थापनाकडे देण्याच्या निर्णयाने गोव्यात खळबळ माजली आहे. हा निर्णय घेताना केंद्र सरकारने गोवा सरकारला पूर्णत: अंधारात ठेवले अशी प्रतिक्रिया पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

वास्तविक ‘असे महत्वाचे निर्णय घेताना, स्थानिक सरकारला विश्वासात घेणो गरजेचे होते. मात्र केंद्र सरकारने आम्हाला पूर्णत: अंधारात ठेवले.’ अशी प्रतिक्रिया मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. केंद्राच्या या निर्णयाबद्दल शंका व्यक्त करताना, ही स्थळे नेमकी कशासाठी खासगी आस्थापनाकडे दिली जातात याची पूर्ण माहिती स्थानिक सरकारला असणो आवश्यक असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियरचे पवित्र अवशेष ठेवण्यात आले असून या स्थळाला केवळ वारसा महत्वच नसून धार्मिक महत्वही आहे. या चर्चशी लोकांच्या धार्मिक भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे असे निर्णय घेताना आवश्यक असलेली संवेदनशीलता घेतली गेली नाही असे सरदेसाई म्हणाले. या संदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी पर्यटनमंत्री बाबु आजगावकर, स्थानिक आमदार असलेले मंत्री पांडुरंग मडकईकर, चर्चचे पदाधिकारी, मुख्य सचिव तसेच पुरातत्व खात्याच्या अधिका-यांची बैठक येत्या आठवडय़ात घेऊन राज्य सरकार आपला निर्णय केंद्र सरकारला कळविणार असे सरदेसाई यांनी सांगितले. गोव्यातील वारसा स्थळे खासगी आस्थापनांच्या हाती देण्यास यापूर्वी आम आदमी पक्षाने विरोध केला आहे. वारसाप्रेमींनीही केंद्राच्या या निर्णयाबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.

Web Title: Goa goverment had no idea about remodification of heritage buildings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.