मडगावात साडेसहा लाखांचा गांजा जप्त, एका युवकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 09:12 PM2018-04-30T21:12:04+5:302018-04-30T21:12:04+5:30

मडगाव पोलिसांनी आज सांयकाळी फैयझन शहाजन सय्यद (18) या युवकाला अटक करुन त्याच्याकडील साडेसहा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.

Ganja was seized by a man in Madgaon, and arrested by a young man | मडगावात साडेसहा लाखांचा गांजा जप्त, एका युवकाला अटक

मडगावात साडेसहा लाखांचा गांजा जप्त, एका युवकाला अटक

Next

मडगाव : मडगाव पोलिसांनी आज सांयकाळी फैयझन शहाजन सय्यद (18) या युवकाला अटक करुन त्याच्याकडील साडेसहा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. शहरातील मोतीडोंगर येथे गांजा विकण्यासाठी आला असता, मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्यामार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली.

सय्यद हा अमलीपदार्थ विक्रीत सक्रीय असून, यापुर्वीही त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळी अल्पवयीन असल्याने नंतर तो सुटला होता.
चालू वर्षात मडगाव पोलिसांनी गांजा प्रकरणी एकूण आठ प्रकरणो नोंद केली असून, आजच्या कारवाईत जप्त केलेला गांजा हा सर्वात जास्त आहे. कर्नाटकातून हा गांजा आणल्याची कबुली सय्यदने पोलिसांना दिली आहे.

तो गांजा घेऊन विकण्यासाठी मोतीडोंगर येथे येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा सापडला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयांर्तगत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Ganja was seized by a man in Madgaon, and arrested by a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.