सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:31 PM2018-09-14T13:31:39+5:302018-09-14T13:43:31+5:30

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत.

Fuel Hike : Goa is on second number to sales cheapest petrol | सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे

सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे

Next

- विलास ओहाळ

पणजी : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत. यानंतर आगरतळाचा नंबर लागतो. याशिवाय मोठ्या वाहनांसाठी लागणारे डिझेल  पोर्ट ब्लेअर, इटानगर आणि आयझोल सर्वात स्वस्त मिळत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात रुपायाची घसरण होत असल्याने त्याचा फटका इंधन दरवाढीवर होत आहे. दिवसेंदिवस इंधन दरवाढीमुळे जनतेतून असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे समाज माध्यमातून केंद्र सरकारबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ट्रोल करण्यात येत आहे.

एकीकडे देशभरातील पेट्रोलचे दर शंभरीकडे वाटचाल करत असले तरी 80 रुपयांच्या खाली पेट्रोलचे लिटरचे दर गोव्यात असल्याने येथील जनतेतून कोणताही असंतोष व्यक्त होत नाही. असंतोष व्यक्त होत आहे तो विरोधी पक्षातून. देशात सर्वात कमी दरात पेट्रोल अंदमान निकोबार बेटावर पोर्ट ब्लेअर येथे मिळते. याठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवर केवळ 6 टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे येथील दर कमी असल्याचे म्हटले जाते. पोर्ट ब्लेअरच्या दरानंतर गोव्यातील पेट्रोलचे दर कमी आहेत. त्यानंतर तिस-या क्रमांकावर आगरतळाचे दर स्वस्त असून, याठिकाणी 79.71 रुपये अशा दराने विक्री होत आहे. 

सध्या सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात विकले जात आहे. याठिकाणी पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 90.45 रुपये आहेत. त्याचबरोबर सोलापूरमध्ये 88.89 रुपये प्रति लिटर पेट्रोल विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटरचा आजचा भाव 88.67 रुपये राहिला आहे. डिङोलच्या दराची आजची स्थिती पाहिली तर हैदराबादमध्ये सर्वाधिक दर आहेत. त्या ठिकाणी आकारल्या जाणा-या व्हॅटमुळे हे दर वाढलेले दिसून येतात. येथे प्रति लिटरसाठी 79.83 रुपये मोजावे लागत आहेत. केरळ, छत्तीसगड, तेलंगणा आणि गुजरातमध्येही डिङोलचे दर इतरांच्या तुलनेत महाग असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात अमरावतीमध्ये डिझेलसाठी प्रति लिटरला 78.81 रुपये मोजावे लागत आहेत. 

गोव्यातील आजचे पेट्रोलचे प्रति लिटरचे दर

उत्तर गोवा 74.88 रुपये

पणजी 74.88 रुपये

दक्षिण गोवा 74.63 रुपये

डिझेलचे आजचे दर 

उत्तर गोवा 74.59 रुपये

पर्वरी 74.78 रुपये

दक्षिण गोवा 74.34 रुपये

Web Title: Fuel Hike : Goa is on second number to sales cheapest petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.