देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:04 AM2019-05-13T05:04:33+5:302019-05-13T05:08:06+5:30

देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे.

Fear of patriotism, issue of development disappeared - Kumar Ketkar; Three books of Raju Nayak are published in Goa | देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन

देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन

Next

पणजी : देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. अशा वातावरणात तुम्ही मोदी-शहा-डोवाल यांना मत देत आहात, भाजपला नव्हे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्या ‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात केतकर बोलत होेते. येथील मॅकेनिज पॅलेस सभागृहात हा सोहळा झाला. मंचावर राजू नायक, चित्रकार सुभाष अवचट उपस्थित होते.
केतकर यांनी सुमारे तासभराच्या भाषणात देशातील राजकीय अवकाशाची मांडणी केली. ती करताना मोदी काळाचा उदय कसा झाला आणि सध्याची राजकीय स्थिती कशी आहे, याची मीमांसा केली.
ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या निर्मितीपासून त्यांनी भाषणास प्रारंभ केला. यानंतर अण्णा हजारे यांचे आंदोलन ‘एंटरटेन्मेंट शो’ कसा ठरला, ते त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशभर कशी वातावरणनिर्मिती केली गेली, याची नेमकी माहिती त्यांनी दिली.


गोव्यातील अधिवेशनात लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्यांना न मोजता मोदी यांच्या नावाची घोषणा भावी पंतप्रधान म्हणून करण्यात आली. येथे या राजकीय नाट्याचा पहिला अंक संपला आणि नंतरच्या काळात मोदी पंतप्रधान झाले. भाजपच्या या नेपथ्यरचनेमुळे काँग्रसही गांगरून गेलेली आणि त्यातून ती प्रदीर्घ काळ बाहेर येऊ शकली नव्हती.
पत्रकार प्रभाकर ढगे यांनी प्रास्ताविक केले. स्वागत करताना राजू नायक यांनी लेखनामागील भूमिका विषद केली. चित्रकार सुभाष अवचट यांनीही मनोगत व्यक्त केले. मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी आभार मानले.

Web Title: Fear of patriotism, issue of development disappeared - Kumar Ketkar; Three books of Raju Nayak are published in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा