वाहन अपघातांत चार महिन्यांत 97 ठार, 85 अल्पवयीन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:06 PM2019-06-06T20:06:42+5:302019-06-06T20:06:59+5:30

एकूण 1213 वाहन अपघातांची नोंद चार महिन्यांत झाली, अशी माहिती पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे.

During the four months of the car accident, 97 killed and 85 minor operators were arrested | वाहन अपघातांत चार महिन्यांत 97 ठार, 85 अल्पवयीन चालकांवर कारवाई

वाहन अपघातांत चार महिन्यांत 97 ठार, 85 अल्पवयीन चालकांवर कारवाई

Next

पणजी : राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण गेल्या चार महिन्यांत थोडे गंभीरच राहिले. एकूण 97 व्यक्तींचे जीव जानेवारी ते दि. 30 एप्रिल 2019 पर्यंतच्या कालावधीत गेले. पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतूक नियम भंग करणा-यांविरुद्ध विशेष कारवाई मोहीमही चार महिन्यांत राबवली. एकूण 85 अल्पवयीन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. 1791 चालकांविरुद्ध खटले गुदरले गेले.
एकूण 1213 वाहन अपघातांची नोंद चार महिन्यांत झाली, अशी माहिती पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे. विविध प्रकारे वाहतूक नियमांचा जे भंग करतात, अशा 1791 चालकांविरुद्ध कारवाई झाली. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याबाबत 590 चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी खटले दाखल केले. वाहनांमध्ये बदल केल्याने साठजणांविरुद्ध कारवाई केली गेली. 85 अल्पवयीन वाहन चालविताना सापडले, ज्यांच्याकडे वाहतूक परवाना असण्याचा प्रश्नच नव्हता. 1116 चालकांविरुद्ध आक्षेपार्ह लाईटबाबत कारवाई झाली.

पणजीत ट्रकांना बंदी 
पणजी शहरात सकाळी नऊ वाजल्यानंतर ट्रकांना प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय वाहतूक पोलिस अधीक्षक, वाहतूक खात्याचे अधिकारी, स्मार्ट सिटीशीनिगडीत अधिकारी व पणजी महापालिकेच्या संयुक्त बैठकीत  घेण्यात आला. आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर उदय मडकईकर यांनी मिळून ही बैठक घेतली. पणजी बाजारपेठेत सकाळी नऊनंतर ट्रक येतात तसेच सकाळी आठनंतर येणारे ट्रकही दुपारी बारा वाजेर्पयत तिथेच राहतात. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे बैठकीत ठरले. पणजीतील हॉटेलांसमोर दोनपेक्षा जास्त पर्यटक वाहने पार्क केलेली असू नयेत. ती वाहने नेऊन सांता मोनिका जेटीकडील बहुमजली पार्किग प्रकल्पात ठेवावी. रेन्ट अ बाईक व्यवसायिक बेकायदा पद्धतीने सगळीकडेच आपली वाहने पार्क करून ठेवतात व यामुळे लोकांना जागाच मिळत नाही. याविरुद्धही कारवाई व्हायला हवी असे बैठकीत ठरल्याचे मडकईकर यांनी सांगितले.

कॅसिनो व्यवसायिकांची बैठक 
वाहतूक पोलिसांच्या अधीक्षकांकडून लवकरच पणजीतील मांडवी नदीतील कॅसिनो व्यवसायिकांची बैठक घेतली जाईल. सर्व कॅसिनो व्यवसायिकांनी पणजीतील वाहतूक रचना व पार्किग व्यवस्था सुधारावी म्हणून सहकार्य करावे असे अपेक्षित आहे. कॅसिनोंमध्ये जे ग्राहक येतात, त्यांची वाहने बहुमजली पार्किग प्रकल्पातच जायला हवी. तसेच टुरिस्ट हॉस्टेलसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूला दुचाक्या व अन्य वाहने पार्क केलेली असतात त्याविरुद्धही प्राधान्याने कारवाई केली जाईल. कारण त्या मार्गाने जर कधी अग्नीशामक दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका आणण्याची पाळी आली तर, अशा वाहनाला वावच मिळणार नाही, असे मडकईकर म्हणाले.

Web Title: During the four months of the car accident, 97 killed and 85 minor operators were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात