थिवी : मांद्रे-दांडोसवाडा येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लब आयोजित पेडणे तालुका मर्यादित व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या दि. १० रोजी बांदेश्वर मंदिराजवळ घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ४ हजार रूपये, तर उपविजेत्या संघाला २५०० चे बक्षीस दिले जाणार आहे. (वार्ताहर)