भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे  - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 01:42 PM2018-05-20T13:42:27+5:302018-05-20T13:42:39+5:30

कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले

BJP should stop using the governor to take power now: Shiv Sena | भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे  - शिवसेना

भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे  - शिवसेना

Next

पणजी : कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे आता थांबवावे आणि जनादेशाचा विनम्रपणे आदर करावा, अशी खरमरीत टीका गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.     

त्या म्हणतात की, ‘राज्यपालपदाचा गैरवापर करून जबरदस्तीने सत्ता काबीज करणे हा भाजपचा धर्मच बनला असून याच क्लृप्त्या त्यांनी गोव्यातही वापरल्या. कर्नाटकात सणसणीत धडा मिळाल्यानंतर तरी त्यांनी हे उद्योग थांबवून जनतेच्या कौलाचा आदर करावा. कर्नाटक विधानसभेत जे काही घडले आहे तो लोकशाहीचा विजय आहे, असे शिवसेना मानते. आमदारांना गृहित धरण्यास भाजपला अटकाव करणाºया सर्वोच्च न्यायालयावरची आमची श्रद्धाही यामुळे दृढ झाली आहे. भाजपकडे बहुमत नसल्यामुळेच येडियुराप्पा यांना राजीनामा देणे भाग पडले.’ 

राष्ट्रगीत सुरू असताना भाजपचे आमदार विधानसभेतून बाहेर पडत होते यावरूनच त्यांच्या ढोंगी देशभक्तीचे दर्शन घडले. राष्ट्रगीताचा अवमान करणाºया या आमदारांविरुद्धही कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी नाईक यांनी कली आहे.

‘म्हादईबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी’

कर्नाटकातील राजकीय घटना गोव्याने विसरून चालणार नाही. आम्ही म्हादईच्या विषयावर खरोखरच सुटकेचा नि:श्वास सोडू शकतो काय, हा खरा प्रश्न आहे, असे नमूद करून राखी म्हणतात, की कर्नाटकात सत्तेवर आलो तर पाणी वळविण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. आता भाजप सत्तेत नाही; पण मग काँग्रस-जद यांची भूमिका काय असेल? म्हादईबद्दल गोवा कॉग्रेस पक्षाने नि:संदिग्ध निवेदन केले पाहिजे. आता कर्नाटकात त्यांचे सरकार येत आहे आणि मतदारांना खूष करण्यासाठी आम्ही या विषयावर काँग्रेसकडून कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.

म्हादईबाबत अमित शहा यांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेसने नेहमीच टीका केली असली तरी स्वत:चे पत्ते मात्र झाकूनच ठेवले आहेत. काँग्रेस याबाबत तडजोड करणार नाही, हे या पक्षाने स्पष्टपणे सांगितले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: BJP should stop using the governor to take power now: Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.