पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 01:03 PM2019-03-03T13:03:21+5:302019-03-03T13:07:44+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आज सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे.

Ailing Goa Chief Minister Manohar Parrikar Discharged | पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत

पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत

ठळक मुद्दे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आज सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. अंतर्गत रक्तस्राव चालू आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्यापर्रीकर फेब्रुवारी 2018 पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार झालेले आहेत.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आज सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे. विविध वैद्यकीय चाचण्या घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर दोनापॉल येथे त्यांच्या खासगी निवासस्थानी उपचार सुरू आहेत.

गोमेकॉच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. अंतर्गत रक्तस्राव चालू आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. सर्व काही नियंत्रणात असल्याचा दावा सूत्रांनी केला. पर्रीकर फेब्रुवारी 2018 पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार झालेले आहेत.

पर्रीकर यांना गेल्या आठवड्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात रात्रीच्यावेळी तातडीने दाखल करावे लागले होते. त्यांच्या पोटात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टरांनागोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  बोलवून घ्यावे लागले होते. दोन्ही डॉक्टरांनी पर्रीकर यांची पूर्ण तपासणी केली. पर्रीकर यांचा रक्तस्त्राव बंद झाला. सभापती प्रमोद सावंत यांच्या मते पर्रीकर यांना रक्ताची उलटीही झाली होती. त्याबाबतही डॉक्टरांकडून उपाययोजना करण्यात आली. प्रकृती नाजूक बनल्याने गेल्या 23 रोजी त्यांना गोमेकॉत दाखल केले होते व चार दिवसांनी गेल्या मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. 

Web Title: Ailing Goa Chief Minister Manohar Parrikar Discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.