काळ्याफिती लावून केले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:16 AM2018-05-25T01:16:55+5:302018-05-25T01:16:55+5:30

नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती सचिन बोबाटे यांनी मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांना शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काळ्याफिती लावून काम केले. तालुक्यातील काटली येथील शुभांगी डोईजड या तीन वर्षाच्या मुलीने रॉकेल प्राशन केले.

Work done by blackmailing | काळ्याफिती लावून केले काम

काळ्याफिती लावून केले काम

googlenewsNext
ठळक मुद्देवेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही : माजी शिक्षण सभापतींची मुख्याधिकाऱ्यांना शिविगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती सचिन बोबाटे यांनी मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांना शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काळ्याफिती लावून काम केले.
तालुक्यातील काटली येथील शुभांगी डोईजड या तीन वर्षाच्या मुलीने रॉकेल प्राशन केले. तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मुलीच्या नातेवाईकांनी सचिन बोबाटे यांना फोन करून नगर परिषदेची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार सचिन बोबाटे यांनी बुधवारी सायंकाळी जवळपास ५.३० वाजता नगर परिषदेच्या १०१ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर बोबाटे यांनी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांना फोन करून रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. उपाध्यक्षांनी तत्काळ रुग्णवाहिका चालकाला फोन करून रुग्णवाहिका पाठविली. रुग्णवाहिका पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी थांबली होती. दरम्यान बोबाटे यांनी नगर परिषद कार्यालय गाठले व मुख्याधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेबाबत विचारणा केली. सचिन बोबाटे व मुख्याधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान बोबाटे यांनी मुख्यधिकाऱ्यांना अश्लिल शब्दात शिविगाळ केली. याबाबतची तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळीच दाखल केली. त्यानुसार बोबाटे यांच्यावर भादंवि कलम ५०४, ५०६ व १८६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पुन्हा तक्रार दाखल केली. त्यानुसार बोबाटे यांच्यावर कलम ११० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मुख्याधिकाऱ्यांना शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्याफिती लावून काम केले. मुख्याधिकारी यांना शिविगाळ केल्या प्रकरणी सचिन बोबाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली.
१०१ क्रमांकावरील कर्मचारी व चालक राहतात गायब
अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडे १०१ क्रमांकाचा दूरध्वनी आहे. आकस्मिक स्थितीत अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये रुग्णवाहिका चालक, अग्निशमन चालक व एका चौैकीदाराची नेमणूक केली जाते. मात्र बऱ्याचवेळा सायंकाळी ६ वाजताच्या नंतर यातील एकही कर्मचारी हजर राहत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. फोन उचलला जात नसल्याने नगर परिषेच्या पदाधिकारी व सदस्यांना फोन करून रुग्णवाहिका चालकासह उपलब्ध करून देण्याची विनवणी करावी लागते.
रात्री ७ ते ८ वाजताच्या दरम्यान एकही रुग्णवाहिकेचा चालक नगर परिषदेत राहत नाही. २४ तास नगर परिषदेत राहणे ही चालकाची जबाबदारी आहे. गैरहजर असणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी नगरसेवक सतीश विधाते यांनी केली आहे.

Web Title: Work done by blackmailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.