महिला मत्स्य व्यवसाय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:40 AM2018-05-28T01:40:46+5:302018-05-28T01:40:46+5:30

अहेरी पंचायत समिती अंतर्गत राजाराम येथील महिला बचत गटाने मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन तलाव घेतला. मत्स्य बीज टाकून मत्स्य व्यवसायासाठी बचत गटातील महिला पुढे सरसावल्या आहेत.

 Women do fisheries business | महिला मत्स्य व्यवसाय करणार

महिला मत्स्य व्यवसाय करणार

Next
ठळक मुद्देबचतगटाचा पुढाकार : राजारामच्या तलावात मत्स्यबीज टाकले

लोकमत न्यूज नेटवर्क
राजाराम : अहेरी पंचायत समिती अंतर्गत राजाराम येथील महिला बचत गटाने मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन तलाव घेतला. मत्स्य बीज टाकून मत्स्य व्यवसायासाठी बचत गटातील महिला पुढे सरसावल्या आहेत.
राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मामा तलावाची पेसा कायद्यान्वये लिलाव प्रक्रिया पार पाडली. या लिलावात जय श्रीराम महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. मत्स्य व्यवसाय करण्याकरिता तीन वर्षाचा तलाव ठेका पध्दतीने घेण्यात आला. रविवारी बचत गटाच्या महिलांनी या तलावात मत्स्यबीज सोडले. यावेळी पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, बचत गटाच्या अध्यक्ष महेश्वरी बत्तुलवार, सचिव वनिता आलाम, सदस्य भावना सडमेक, सुनिता आत्राम, वनिता आत्राम, मूत्यमबाई आलाम, अर्चना सोयाम, कांता कोडापे, विमला आत्राम तसेच माजी उपसरपंच संजय पोरतेट, व्यंकटेश अलोणे हजर होते.

Web Title:  Women do fisheries business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.