चोरट्यास सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:06 PM2018-10-15T23:06:53+5:302018-10-15T23:07:08+5:30

घराचा दरवाजा तोडून सुमारे १ लाख ८२ हजार ५९९ रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यास मुख्य न्याय दंडाधिकारी गडचिरोली यांनी सात वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.

Seven years of imprisonment for seven years | चोरट्यास सात वर्षांचा कारावास

चोरट्यास सात वर्षांचा कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देदोन लाखांची चोरी : ३० हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : घराचा दरवाजा तोडून सुमारे १ लाख ८२ हजार ५९९ रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यास मुख्य न्याय दंडाधिकारी गडचिरोली यांनी सात वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.
सागर रमेश भोयर (२३) रा. विवेकानंदनगर असे आरोपीचे नाव आहे. पोटेगाव बायपास मार्गावरील शांतीनगर येथील कपील हरिदास जांभुळे यांच्या घरी २७ आॅगस्ट २०१७ रोजी प्रवेश करून घरातील १ लाख ८२ हजार ५९९ रूपयांचे सोन्याचे दागिणे सागर भोयर याने चोरून नेले. याबाबतची फिर्याद दाखल केली. सहायक फौजदार दादाजी करकाडे यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला व प्रकरण न्यायालयात दाखल केले. आरोपीविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी गडचिरोली बी.एम.पाटील यांनी आरोपीला सात वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने वाढीव साध्या कारावासाची शिक्षा दिली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते, शकील सय्यद यांनी काम पाहिले.

Web Title: Seven years of imprisonment for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.