दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर

By admin | Published: May 7, 2017 01:13 AM2017-05-07T01:13:57+5:302017-05-07T01:13:57+5:30

एकाच मार्गावरून धावणाऱ्या दोन दुचाकींची एकमेकाला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना

A serious two-wheeler shock | दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर

दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर

Next

गोठणगावजवळ अपघात : रूग्णालयात भरती
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : एकाच मार्गावरून धावणाऱ्या दोन दुचाकींची एकमेकाला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोठणगाव फाट्याजवळ घडली.
सागर राहूल डोंगरवार (३०) रा. धाबेटेकडी ता. अर्जुनी असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याच मार्गावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम हे आपल्या खासगी वाहनाने जात होते. त्यांना अपघात झाला असल्याचे लक्षात येताच वाहन थांबवून जखमीला वाहनात मांडून उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे दाखल केले. सागर हा आपल्या नातेवाईकांकडे अंगारा येथे लग्न कार्याकरिता आला होता. लग्न कार्याच्या कामाकरिता दोन दुचाकीने चौघेजण ताडगावकडे जात होते. जाताना दोन दुचाकी एकामेकामध्ये अडकल्याने सदर अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जखमींची पं.स. सदस्य श्रीराम दुगा यांनी रूग्णालयात भेट घेतली.

Web Title: A serious two-wheeler shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.