‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:41 AM2018-04-12T00:41:23+5:302018-04-12T00:41:23+5:30

पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शासन शाळा बंद करीत आहे. शिक्षकांच्या माथी अध्यापनाव्यतिरिक्त कामे लादून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेंशनच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.

'Save School, Save Education' campaign | ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अभियान

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अभियान

Next
ठळक मुद्देशाळा बंद करू नका : शिक्षक समितीकडून चौकात जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शासन शाळा बंद करीत आहे. शिक्षकांच्या माथी अध्यापनाव्यतिरिक्त कामे लादून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेंशनच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. शासनाचे हे धोरण अन्यायकारक असून सामान्य जनतेतून याला विरोध व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात जनजागृती कार्यक्रम घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्वच मुलांना कोणताही भेदभाव न करता मोफत गणवेश उपलब्ध करून द्यावे, भांडवलदारांच्या नफ्यासाठी शासनाकडून शिक्षणाचे कंपनीकरण केले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी व जागतिक बँकेच्या दबावाखाली केंद्र शासनाने व अनेक राज्य सरकारांनी कर्मचारी शिक्षकांसाठीची शाश्वत सेवानिवृत्ती वेतन योजना बंद केली आहे. परिभाषित अंशदायी पेंशन योजना आणि राष्ट्रीय पेंशन योजनेच्या अंमलबजावणीमुळे १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत आलेल्या देशभरातील शिक्षक कर्मचाºयांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. शिक्षक कर्मचाºयांनी जुनी पेंशन योजना लागू करावी, याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमादरम्यान विविध शिक्षकांनी स्वत:ची मते मांडून शिक्षणाची शासन कशी गळचेपी करीत आहे, याचा पाढा वाचला. सदर आंदोलन महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, गणेश काटेंगे, योगेश ढोरे, माया दिवटे, अरूण पुण्यप्रेडीवार, अशोक दहागावकर, राजेश बाळराजे, हेमंत मेश्राम, सुरेश नाईक, देवाजी तिम्मा, मेघराज बुराडे, खिरेंद्र बांबोळे, रवींद्र मुलकलवार, डंबेश पेंदाम, मनोज रोकडे, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, संजय लोणारे, प्रेमचंद मेश्राम, संगीता लाकडे, राकेश सोनटक्के, रोशनी राकडे, ब्रह्मानंद उईके, दीपक नाकाडे, साईनाथ अलोणे, टार्झन सूरजागडे, प्रशांत काळे, प्रमोद पाल, सुरेश मडावी, अनिल उईके, विलास भांडेकर, दुधराम मोंगरकर, यामिनी कोवे, दिलीप नैताम, राजेंद्र भुरसे, विठ्ठल होंडे, संजय वडेट्टीवार, देवराव दहिकर, संगीता लाकडे, सिद्धार्थ भानारकर, हरीशचंद्र वाघाडे, प्रेमदास दुधबावरे, नरेश गेडाम, दोशहर सहारे, विजय नंदनवार, योगेश वाढई, मोरेश्वर अंबादे, कृष्णा पोहरे, रवींद्र घोंगडे आदी शिक्षक हजर होते.
आंदोलनाला अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, लतिफ खॉ पठाण, पांडुरंग पेशने, श्रीकृष्ण मंगर, दिवाकर निंदेकर यांनीही भेट दिली.

Web Title: 'Save School, Save Education' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.