बीआरएसपीतर्फे बलात्कार प्रकरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:36 AM2018-04-21T01:36:14+5:302018-04-21T01:36:14+5:30

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जम्मू-काश्मिर राज्यातील एका व उत्तरप्रदेशातील एका मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.

The RSP prohibits the rape case | बीआरएसपीतर्फे बलात्कार प्रकरणाचा निषेध

बीआरएसपीतर्फे बलात्कार प्रकरणाचा निषेध

Next
ठळक मुद्देसरकारच्या विरोधात गडचिरोलीत निदर्शने : पीडित मुलीला श्रद्धांजली; आरोपींवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जम्मू-काश्मिर राज्यातील एका व उत्तरप्रदेशातील एका मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.
यावेळी बीआरएसपीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बलात्कार प्रकरणातील पीडित दोन्ही मुलींना श्रद्धांजली अर्पण केली. सदर बलात्कार प्रकरणाबाबत पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात टीका करून निदर्शने केली. बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव विलास कोडापे व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. कैलास नगराळे यांच्या विरोधात हा निषेधाचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी बीआरएसपीचे मीडिया प्रभारी प्रतीक डांगे यांच्यासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बीआरएसपीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर दोन्ही बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यात यावा, या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

बीआरएसपीतर्फे बलात्कार प्रकरणाचा निषेध
सरकारच्या विरोधात गडचिरोलीत निदर्शने : पीडित मुलीला श्रद्धांजली; आरोपींवर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जम्मू-काश्मिर राज्यातील एका व उत्तरप्रदेशातील एका मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.
यावेळी बीआरएसपीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बलात्कार प्रकरणातील पीडित दोन्ही मुलींना श्रद्धांजली अर्पण केली. सदर बलात्कार प्रकरणाबाबत पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात टीका करून निदर्शने केली. बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव विलास कोडापे व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. कैलास नगराळे यांच्या विरोधात हा निषेधाचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी बीआरएसपीचे मीडिया प्रभारी प्रतीक डांगे यांच्यासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बीआरएसपीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर दोन्ही बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यात यावा, या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: The RSP prohibits the rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.