सहसचिवांनी घेतला क्रीडा संमेलनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:38 PM2017-12-17T23:38:15+5:302017-12-17T23:38:37+5:30

आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत येथील जिल्हा पे्रक्षागार मैदानावर आयोजित केले असून या क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने गडचिरोली प्रकल्पांतर्गत....

Review of the sports conclave by co-sycites | सहसचिवांनी घेतला क्रीडा संमेलनाचा आढावा

सहसचिवांनी घेतला क्रीडा संमेलनाचा आढावा

Next
ठळक मुद्देखेळाडूंसोबत केली चर्चा: आदिवासी विकास विभागीय स्पर्धेची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत येथील जिल्हा पे्रक्षागार मैदानावर आयोजित केले असून या क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने गडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या आश्रमशाळेच्या खेळाडूंच्या सराव शिबिरास रविवारी आदिवासी विकास विभागाचे सहसचिव सुनील पाटील यांनी भेट दिली व क्रीडा संमेलनाचा आढावा घेतला.
जिल्हा प्रेक्षागार मैदानावर १५ डिसेंबर पासून सराव शिबिर सुरू झाले आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचीन ओंबासे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांच्या तांत्रिक नियंत्रणाखाली सुरू असलेल्या या सराव शिबिरात कारवाफा, सोडे, भाडभिडी, अंगारा, कोरची या पाच बिटातील २५ शासकीय व १८ अनुदानित अशा एकूण ४३ आश्रमशाळेतील १६९ मुले व १५९ मुली अशा ३२८ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या शिबिराची आज सहसचिव सुनील पाटील यांनी पहाणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, लेखाधिकारी किशोर वाट, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक सुधाकर गौरकार, क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर आदी उपस्थित होते. विभागीय क्रीडा संमेलनाच्या दृष्टीने गडचिरोली प्रकल्पातील प्रकल्पातील खेळाडूंचा जोरदार सराव सुरू असून व्ही. जी. चाचरकर, सुधीर झंझाड, सतीश पवार, वंदना महले, मंगेश ब्राम्हणकर, अनिल बारसागडे, प्रेमिला दहागावकर, अनिल सहारे लुमिशा सोनेवाने, निर्मला हेडो, चंदा कोरचा, विनायक क्षीरसागर आदी क्रीडा शिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत.
 

Read in English

Web Title: Review of the sports conclave by co-sycites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.