महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:32 AM2019-07-11T00:32:41+5:302019-07-11T00:33:08+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले.

Revenue employees' demonstrations | महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा दुसरा टप्पा : सामूहिक रजेमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले.
नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने करण्यात यावी, पुरवठा विभागातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना दतर्थ पदोन्नती द्यावी, महसूल कर्मचाºयांचे विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावी, सरळ सेवा कोठ्यातील नायब तहसीलदाराची पदे दतर्थरित्या पदोन्नतीने भरावी, पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमित पदांचा कार्यभार द्यावा, सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणाहून मागविण्यात येणाºया नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचाºयांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास १० जुलै रोजी महसूल कर्मचारी सामुहिक रजेचा अर्ज सादर करून महसूल मंडळाच्या कार्यालयासमोरी निदर्शने केली. ११ व १२ जुलै रोजी लेखनी बंद ठेवून कर्मचारी निदर्शने करणार आहेत. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
आरमोरी येथील आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, आरमोरी तालुकाध्यक्ष नितीन उंदीरवाडे, जिल्हा सरचिटणीस गौरीशंकर डेंगे, अमोल नन्नावरे, रामटेके, जवंजाळकर, उत्तरा राऊत, मनीषा मडावी, इंदू मेश्राम, वंदना धाईत, बाबुराव वनकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Revenue employees' demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप