सुसंवादातून तंट्यांचा निपटारा शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:58 PM2018-01-27T22:58:26+5:302018-01-27T22:58:51+5:30

घरातील विसंवादामुळे झालेली भांडणे, एकमेकांना समजून न घेता निर्माण झालेले वाद, तंबाखू- दारू या वाढत्या व्यसनामुळे बिघडलेले घर, संसार अलिकडे मोठ्या प्रमाणात सदर वाद वाढलेले आहे.

Problems can be resolved through dialogue | सुसंवादातून तंट्यांचा निपटारा शक्य

सुसंवादातून तंट्यांचा निपटारा शक्य

Next
ठळक मुद्देआयटीआयमध्ये कायदेविषयक शिबिर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : घरातील विसंवादामुळे झालेली भांडणे, एकमेकांना समजून न घेता निर्माण झालेले वाद, तंबाखू- दारू या वाढत्या व्यसनामुळे बिघडलेले घर, संसार अलिकडे मोठ्या प्रमाणात सदर वाद वाढलेले आहे. यावर ज्येष्ठ मंडळीनी मार्गदर्शन करून घरात सुसंवाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्यास बहूतेक वाद सहज संपुष्टात येऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य के. एस. विसाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश बी. एम. पाटील, प्रबंधक एन. पी. मेंढे उपस्थित होत्या. याप्रसंगी न्या. पाटील म्हणाले, न्याय सेवा सदन जनतेला न्यायविषयक मदत देते. न्यायालयाविषयी प्रचलित असलेले गैरसमज दूर करून न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य विसाळे यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन शिबिर प्रशिक्षणार्थ्यांकरिता आयोजित केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बी. आर. बोढेकर यांनी केले तर आभार भास्कर मेश्राम यांनी मानले. याप्रसंगी डीआरडीओ अंबरनाथ या कंपनीत रूजू झालेले माजी विद्यार्थी टिकाराम लाटलवार आणि त्याचे निदेशक संदीप पारटवार यांचा पुष्पगुच्छ देऊन न्या. मेहरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या शिबिरात धुम्रपान विरोधी कायदा, नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य व विधी सेवा, विवाह पूर्व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Problems can be resolved through dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.