ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निकाल : सोनापूर येथील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पत्नीला मारहाण करताना हटकणाºया इसमाचा कुºहाडीने वार करुन खून करणाºया आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र उर्फ रावण तारास रा.सोनपूर, ता.कोरची असे दोषी इसमाचे नाव आहे.
सोनपूर येथील राजेंद्र उर्फ रावण महारु ताराम याने शेतात धानाचे चुरणे सुरु असताना आपल्या पत्नीशी भांडण करुन तिला कुºहाडीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतावर उपस्थित मोहित सरपा याने राजेंद्रला हटकून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मोहितवरच कुºहाडीने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर कोटगूल पोलीस मदत केंद्रात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरुन आरोपी राजेंद्र ताराम याच्याविरुद्ध कोटगूल पोलिसांनी भादंवि कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाचा शुक्रवारी निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी राजेंद्र ताराम यास भादंवि कलम ३०४(२)अन्वये पाच वर्षांतर्फे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा प्रमुख सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.