मन्नेवार समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:03 AM2019-01-19T01:03:56+5:302019-01-19T01:04:16+5:30

१९५० पूर्वीचे अनेक महत्त्वपूर्ण सबळ पुरावे मन्नेवार समाजाकडे आहेत. तरीसुद्धा मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र न देता समाजाची सर्व प्रकरणे गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अवैध ठरवित आहे, असा आरोप करीत.....

Mannwar Samaj's Front | मन्नेवार समाजाचा मोर्चा

मन्नेवार समाजाचा मोर्चा

Next
ठळक मुद्देअहेरीत धडक : समाजाला जात वैैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : १९५० पूर्वीचे अनेक महत्त्वपूर्ण सबळ पुरावे मन्नेवार समाजाकडे आहेत. तरीसुद्धा मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र न देता समाजाची सर्व प्रकरणे गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अवैध ठरवित आहे, असा आरोप करीत मन्नेमवार समाजाच्या वतीने निषेध नोंदवून अहेरी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढला.
अहेरी येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत आदिवासी मन्नेवार समाजाच्या अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले. समाजावर सातत्याने सरकार व जात वैधता समितिकडून होणाऱ्या अन्यायाच्या व सरकारच्या दुहेरी नीतीबद्दल हजारो मोर्चेकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत राज्य सरकार व जात वैधता पडताळणी समितीविरोधात जोरदार नारेबाजी केली.
त्यानंतर आदिवासी मन्नेवार समाजाच्या वतीने अपर जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात, आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र द्यावे. राज्य सरकारने स्वतंत्र आयोग गठित करून समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षिणक व इतर समस्यांचे संशोधन करावे, गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीवर योग्य कारवाई करावी, मन्नेवार व मन्नेपवार हा एकच समाज असून ‘प’ या शब्दाचा घोळ दुरूस्त करावा आदी मागण्यांच्या समावेश होता. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो मन्नेवार समाजबांधव सहभागी झाले.

Web Title: Mannwar Samaj's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा