शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळीला लक्ष्मी येऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:46 PM2018-10-20T23:46:13+5:302018-10-20T23:47:03+5:30

संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही.

Let the Lakshmi be in the house of the farmers at Diwali | शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळीला लक्ष्मी येऊ द्या

शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळीला लक्ष्मी येऊ द्या

Next
ठळक मुद्देदिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही. धानाचे पीक गेल्यावर्षीपेक्षा थोडे बरे आहे, पण धान किंवा कापसाचे एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. कधी सुरू करणार याचा थांगपत्ता नाही. अशा स्थितीत दिवाळीला खºया अर्थाने शेतकºयांच्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्याची चिन्हं नाही. तरीही कोणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी अस्वस्थ होताना दिसत नाही.
खरीपातील हलका धान कापून मळणीला सुरूवात झाली आहे. मध्यम धानाची कापणी सुरू आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी पुढील आठ दिवसात मळणी होऊन धान विक्रीसाठी तयार केला जाईल. शासनाने हमीभाव जाहीर केले, पण खरेदी केंद्रच सुरू झाले नाही तर त्या भावाने धान घेणार कोण? शेवटी शेतकºयांना कमी भावाने आपला धान व्यापाºयांच्या घशात घालावा लागेल. उत्पादन खर्चाच्या दिड पट भाव देण्याच्या निवडणुकीतील आश्वासनाचा सत्ताधाºयांना विसर पडला असला तरी थोडीफार भाववाढ देऊन सरकारने शेतकºयांवर मेहरबानी केली आहे. पण या भावाचा फायदा व्यापाºयांऐवजी शेतकºयांना मिळण्यासाठी धान खरेदी केंद्र येत्या आठवडाभरात सुरू करणे गरजेचे आहे.
आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाºया सहकारी संस्थांचे कमिशन दिले नसल्याने त्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आदिवासी विकास खातेही आहे. त्यांचा मतदार संघ आदिवासीबहुल आहे. त्यांनी हा विषय मार्गी लावून आपल्या संवेदनशिलतेचा परिचय देणे अपेक्षित आहे.
ग्रामीण भागात अलिकडे सुरू करण्यात आलेले भारनियमनही शेतकºयांच्या जीवावर उठले. आधीच जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा नाहीत. ज्या काही मोजक्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पाणी महावितरण कंपनीने भारनियमन करून अडविणे सुरू केले होते. खासदार अशोक नेते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उर्जामंत्र्यांचे कान टोचल्यानंतर भारनियमनाचे वेळापत्रक बदलविले. कायम निसर्गाच्या कृपेवर विसंबून राहणाºया बळीराजाला प्रत्येक लोकप्रतिनिधीने किमान अशा कृतीतून तरी दिलासा देणे गरजेचे आहे.
यावर्षी अपुºया पावसामुळे राज्याच्या बºयाच भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली असल्याचे सरकारी यंत्रणा सांगत असली तरी शेतकºयांना भरभरून उत्पन्न होईल अशी स्थिती अजिबात नाही. काही भागात तर परिस्थिती खूपच वाईट आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यात शेतकरी लगेच आत्महत्येचा मार्ग पत्करत नाही. म्हणून या शोषिक शेतकºयांचे शोषण होताना उघड्या डोळ्यांनी आपण पाहणेही योग्य नाही. शासन दरबारी सर्व लोकप्रतिनिधींनी जोर लावून या जिल्ह्यातल्या शेतकºयांनाही थोडाफार का होईना, शासकीय मदतीचा दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहीजे.
दिवाळी साजरी करण्यासाठी कर्मचारी वर्गाला पगार, बोनस मिळतो. नेतेमंडळींची दहाही बोटं कायम तुपात असतात. मरण होते ते केवळ शेतकºयांचेच. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याही घराला लक्ष्मीची पावलं लागावी, शेतकºयांच्या नशिबी खूप भरभराट नसली तरी किमान गरजा भागवण्यासाठी कष्टाचा पैसा वेळीच त्यांच्या हाती पडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: Let the Lakshmi be in the house of the farmers at Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.